• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सिमेंटचा पोल अंगावर पडून बालकाचा दुर्दैवी मृत्यू

भडगाव तालुक्यातील कनाशी येथील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 28, 2024
in जळगाव जिल्हा
0
सिमेंटचा पोल अंगावर पडून बालकाचा दुर्दैवी मृत्यू

भडगाव तालुक्यातील कनाशी येथील घटना

भडगाव, (प्रतिनिधी) : शेतातील सिमेंटचा पोल अंगावर पडून १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भडगाव तालुक्यातील कनाशी येथे नुकतीच घडली. विशेष म्हणजे या बालकाचा ३० नोव्हेंबर रोजी वाढदिवस साजरा होणार होता ; त्या आधीच दैवाने त्याला हिरावून नेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

हर्षवर्धन महेंद्र महाले असे या मृत बालकाचे नाव आहे. पाचोरा बस आगारात चालक महेंद्र महाले यांचा हर्षवर्धन हा मुलगा होता. तो कनाशी जि. प. शाळेत तिसरीत शिकत होता. हर्षवर्धन हा सकाळी शाळेत जाण्यासाठी तयार झाला होता. गणवेश घालून घराच्या ओट्यापर्यंत पोहोचला. त्यावेळी शेतात असलेली सायकल घेऊन शाळेत जाऊ या विचाराने तो शेताकडे गेला. त्याचवेळी शेतातील एक सिमेंटचा पोल या बालकाच्या अंगावर कोसळला आणि तो जागीच गतप्राण झाला.

हा प्रकार परिसरातील शेतकऱ्यांच्या लक्षात येताच या बालकाच्या बचावासाठी ते धावले. रुग्णालयात नेले असता त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. हर्षवर्धन याचा शनिवार दिनांक दि. ३० रोजी वाढदिवस साजरा करण्यात येणार होता. याची त्याने तयारी सुरू केली होती. दोन दिवसांपूर्वी वडील महेंद्र महाले यांच्यासोबत भडगाव येथे जाऊन त्याने कपडे खरेदी केले. वाढदिवसासाठी त्याने मोठा केकही मागवला होता. तसेच त्याने वडिलांकडे रिमोट असलेल्या कारची मागणी केली होती. त्याच्या या अचानक जाण्याने कनाशी गाव सुन्न झाले आहे.

Next Post
वाळूमाफियांनी चक्क तहसीलदारांच्या वाहनाला दिली धडक

वाळूमाफियांनी चक्क तहसीलदारांच्या वाहनाला दिली धडक

ताज्या बातम्या

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group