• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अभिनेता गोविंदाच्या रोडशोला पाचोर्‍यात नागरिकांचा उदंड प्रतिसाद

प्रकृती अस्वस्थाने रॅली अर्धवट सोडत गोविंदा मुंबईकडे रवाना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 17, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
अभिनेता गोविंदाच्या रोडशोला पाचोर्‍यात नागरिकांचा उदंड प्रतिसाद

विजय बाविस्कर | पाचोरा, (प्रतिनिधी) : पाचोरा भडगाव मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ पाचोरा व भडगाव शहरात अभिनेता गोविंदा यांच्या जाहीर रोड शोचे आयोजन करण्यात आले होते, मात्र अचानक छातीत वेदना होऊन त्यांना अस्वस्थ जाणवू लागल्याने रॅली अर्धवट सोडत ते तात्काळ मुंबईकडे रवाना झाल्याने चहात्यांचा मात्र हिरमोड झाला.

पाचोरा शहरात महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अभिनेता गोविंदा हे पाचोर्यात दाखल झाले होते. हेलीपॅड वर डॉ.प्रियंका पाटील व महिला आघाडीच्या वतीने त्यांचे औक्षण करत आमदार किशोर आप्पा पाटील व शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. पाचोरा व भडगाव शहरात त्यांच्या भव्य रोड शो चे आयोजन करण्यात आले होते. यासाठी पाचोरा शहरात एम एम महाविद्यालयाच्या प्रांगणात हेलिपॅड ची व्यवस्था करण्यात आली होती.

महाविद्यालयाच्या प्रांगणाच्या सभोवताली अभिनेता गोविंदा व आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या चाहत्यांनी गराडा घालत मोठी गर्दी केली होती. दरम्यान अभिनेता गोविंदा व आमदार किशोर आप्पा पाटील यांनी एकत्रित ओपन जीपमध्ये एकत्र येत एम एम महाविद्यालयाच्या प्रांगणापासून शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत नागरिकांना अभिवादन करत रोड शोला सुरुवात केली. मात्र अचानक त्यांना छातीत वेदना होऊन अस्वस्थपणा जाणवू लागल्याने रोड शो थांबवत ते पुन्हा हेलीपॅड कडे रवाना झाले. तेथून त्यांनी मुंबईकडे प्रयाण केले.

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2024/11/Untitled-25_720p.mp4

हेलीपॅड वर बोलताना त्यांनी आपण प्रकृतीच्या कारणाने दौरा अर्धवट सोडून परत जात असल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली. तर त्यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांना नागरिकांनी खंबीर साथ देण्याचे आवाहन केले.

 


 

Next Post
आमदार राजूमामा भोळे यांनी घेतली उद्योजक अशोक जैन यांची भेट

आमदार राजूमामा भोळे यांनी घेतली उद्योजक अशोक जैन यांची भेट

ताज्या बातम्या

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add