• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या प्रचार रॅलीत जल्लोष, औक्षण, पुष्पवृष्टी..!

धरणगाव तालुक्यातील गावागावात भेटी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 13, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या प्रचार रॅलीत जल्लोष, औक्षण, पुष्पवृष्टी..!

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव ग्रामीण मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून, त्यांच्या आगमनावेळी गावागावात मोठा जल्लोष होताना दिसत आहे. ठिकठिकाणी महिला त्यांचे औक्षण करत आहेत. कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टी करून स्वागत केले जात आहे. त्यांच्या प्रचार रॅलीत अक्षरशः विजयी मिरवणुकीचा भास होत आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द, वंजारी खपाट, अहिरे खुर्द, सोनवद खुर्द व सोनवद बुद्रुक, तरडे, पष्टाणे आदी गावात प्रचार रॅली काढली. यावेळी तळागाळातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी त्यांनी समजून घेतल्या. सेवेची संधी मिळाल्यानंतर पिण्याच्या पाण्यासह सिंचन व्यवस्था, दिवाबत्ती, सार्वजनिक स्वच्छता, रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधा आधी पुरविल्या जातील, अशी ग्वाही देखील माजी मंत्री श्री.देवकर यांनी दिली.

यावेळी उद्धव सेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, धरणगाव तालुकाध्यक्ष जयदीप पाटील, महिला तालुकाध्यक्ष जनाबाई पाटील, संतोष सोनवणे, विजय पाटील, राष्ट्रवादीचे तालुका धनराज माळी, युवक अध्यक्ष मनोज पाटील, माजी जि.प.सदस्य रवींद्र पाटील, कृऊबासचे संचालक दिलीप धनगर, रंगराव सावंत, डॉ.नितीन पाटील, सोनवदचे सरपंच गुलाब पाटील, उपसरपंच नारायण देवरे, वंजारी खपाटचे तुषार चौधरी, विजय चौधरी, डॉ. दीपक पाटील, विकास चौधरी, बबलू काकडे, गोपाल चौधरी, अहिरे येथील शरद पाटील, संजय पाटील, पष्टाणे येथील अभय पाटील, विनायक पाटील, तरडे येथील चंद्रकांत पाटील, सोनवद येथील बाळासाहेब पाटील, उज्ज्वल पवार, संजय पाटील, धीरज पाटील, योगेश पाटील, भाऊसाहेब पाटील, भटू पाटील, पिंप्री खुर्दचे सुरज बच्छाव, शिवाजी गुजर, विजय सूर्यवंशी, नितीन सोनवणे, राजू पाटील उपस्थित होते.

तुमच्या प्रेमातून कधीच उतराई होऊ शकणार नाही..
महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना प्रचार रॅलीदरम्यान निंभोरा (ता.धरणगाव) येथील रोहिदास पाटील, राजेंद्र पाटील, कृष्णराव पाटील, शालीग्राम पाटील, बाळकृष्ण बोरसे, मांगोलाल सोनवणे, नितीन पाटील, पिंटू पाटील, दिलीप पाटील, विजय पाटील, कैलास पाटील, पुडलिक सोनवणे, प्रवीण सोनवणे, अनिल पाटील, जगदीश बोरसे यांनी सुमारे २५ हजार रूपयांचा मदत निधी सोपविला. तुमच्या प्रेमातून मी कधीच उतराई होऊ शकणार नाही, अशी भावना माजी मंत्री श्री.देवकर यांनी व्यक्त केली.

Next Post
अब कि बार, राजूमामाचं आमदार.. इंद्रप्रस्थनगरात जेष्ठ नागरिकांचे आशीर्वाद

अब कि बार, राजूमामाचं आमदार.. इंद्रप्रस्थनगरात जेष्ठ नागरिकांचे आशीर्वाद

ताज्या बातम्या

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add