• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने गुलाबराव पाटील यांना जाहीर पाठिंबा !

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 10, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने गुलाबराव पाटील यांना जाहीर पाठिंबा !

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघात महायुतीचे अधिकृत उमेदवार गुलाबराव पाटील यांना अखिल भारतीय मराठा महासंघाने पाठिंबा जाहीर केला आहे. मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वात हा पाठिंबा देण्यात आला आहे.

महासंघाचा जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सामाजिक एकता आणि विकासाचे उद्दिष्ट ठेवून, गुलाबराव पाटील यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. महासंघाने आपल्या सदस्यांना, मतदारसंघातील सर्व मराठा बांधवांना, तसेच समाजातील इतर घटकांनाही गुलाबराव पाटील यांच्या बाजूने समर्थन देण्याचे आवाहन केले आहे.

गुलाबराव पाटील हे आपल्या भागातील जनतेच्या विकासासाठी कटीबद्ध आहेत. मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळे गुलाबराव पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी महासंघाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख डॉक्टर बीबी भोसले जिल्हा उपाध्यक्ष विश्वास पाटील व सदस्य उपस्थित होते. युवा नेतृत्व तथा जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतापराव पाटील यांनी त्यांचे स्वागत करून ऋण व्यक्त केले आहे.

यावेळी उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख डॉ.बी.बी. भोसले, जिल्हाउपाध्यक्ष विश्वास पाटील, जितेंद्र पाटील, किशोर राघो पाटील, दोनगाव सरपंच भागवत पाटील, नाटेश्र्वर पवार, अमोल पाटील, यांच्यासह अखिल भारतीय मराठा महासंघाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: #political
Next Post
जुने जळगाव परिसरामध्ये डॉ. अनुज पाटील यांचे जल्लोषात स्वागत..

जुने जळगाव परिसरामध्ये डॉ. अनुज पाटील यांचे जल्लोषात स्वागत..

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add