• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मोहरम साध्या पध्दतीने साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारींनी निर्गमित केल्या मार्गदर्शक सुचना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 16, 2021
in सामाजिक
0
मोहरम साध्या पध्दतीने साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारींनी निर्गमित केल्या मार्गदर्शक सुचना

 

जळगाव | (जिमाका) दि. 12 – कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा मोहरम साजरा करण्यासाठी मार्गदर्शक सुचना जाहिर करण्यात आल्या आहेत. त्याचे सर्वांनी पालन करुन साध्या पध्दतीने साजरा करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

यावर्षी मोहरम महिन्याच्या 9 व्या दिवशी दिनांक 18 ऑगस्ट, 2021 रोजी शहादत की रात तसेच योम-ए-आशुरा 10 व्या दिवशी दिनांक 19 ऑगस्ट, 2021 येत असून त्यानिमित्त मात्तम मिरवणुका काढण्यात येतात. परंतु सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूक काढता येणार नाही. कोविड काळात पार पडलेल्या इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे आपापल्या घरात राहूनच मोहरमचा दुखवटा पाळण्यात यावा.

खाजगी मातम देखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन घरीच करावेत. सोसायटीमधील नागरीकांनी देखली एकत्रित मातम/दुखवटा करु नये. वाझ/मजलीस हे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करून ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात यावे. ताजिया/आलप, ताजिया/आलम काढु नयेत. सबील/छबील बांधण्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्याठिकाणी कोविड संदर्भात आरोग्याच्या दृष्टीकोणातून नियमांचे तंतोतंत पालन करावे. सबिलच्या ठिकाणी बंद बाटलीने पाण्याचे वाटप करावे. याठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर) पाळण्याकडे लक्ष देण्यात यावे.

कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधीत महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या काळात आणखी काही मार्गदर्शक सुचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. असेही श्री. राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.


 

Next Post

राज्यातील पहिला कोट्यवधीचा भ्रष्टाचार खणून काढणारे, व्रतस्थ पत्रकार जगतरावनाना सोनवणे यांचे निधन

ताज्या बातम्या

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक
खान्देश

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

August 28, 2026
भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
गुन्हे

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी
जळगाव जिल्हा

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

August 28, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई
जळगाव जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

August 27, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

August 27, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add