• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कट लागल्याच्या कारणावरून तरुणास बेदम मारहाण

मारहाणीत तरुणाचा मृत्यू ; अमळनेर तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 3, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
कट लागल्याच्या कारणावरून तरुणास बेदम मारहाण

अमळनेर, (प्रतिनिधी) : कारमधील तरुणांनी दुचाकीला कट मारल्यानंतर त्यात झालेल्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना आज दि. ३ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास तालुक्यातील जळोद-अमळगाव शिवारात घडली. याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

विकास प्रवीण पाटील (वय ३० रा. अमलेश्वर नगर, अमळनेर) हा मित्रांसह पिंगळवाडे येथे तमाशा पाहण्यासाठी गेला होता. यावेळी त्याच्या मोटरसायकलला स्विफ्ट कार (एमएच १९ बीजे ४७९१) ने कट मारला. यात दुचाकीचे इंडिकेटर तुटले. त्यावरून दोन्ही गटात वाद होऊन अमळगाव जळोद रस्त्यावर हाणामारी झाली.

त्यानंतर काही जणांनी लोखंडी रॉड, दांडके घेऊन आले. त्यात विकास पाटील हा पळत सुटला. मात्र त्याला गाठून संशयित आरोपींनी मारहाण करून त्याचा खून केला व पसार झाले. ही घटना ३ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली. घटनेचे वृत्त कळताच मारवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जीभाऊ पाटील, संजय पाटील यांनी भेट दिली.

दरम्यान घटनेतील आरोपी फरार झाले आहे. मात्र त्यांची धरपकड सुरु असून एलसीबीच्या टीमने जामनेर तालुक्यात तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली असून एक जण शेंदुर्णी परिसरात शिक्षक असल्याचे सूत्रांनी सांगितलं. संशयित आरोपी अमोल वासुदेव कोळी, नितीन दिनकर पवार, हर्षल नाना गुरव, मनोज हनुमंत श्रीगणेश, कमलाकर हनुमंत श्रीगणेश, रोहित सीताराम पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून अमोल कोळी, नितीन पवार, हर्षल गुरव यांना जामनेर तालुक्यातून अटक करण्यात आली आहे. आणखी संशयित आरोपी वाढण्याची शक्यता आहे.

Tags: Crime
Next Post
सिंधी कॉलनीत अवैध गुटख्यासंदर्भात एमआयडीसी पोलीसांची कारवाई

सिंधी कॉलनीत अवैध गुटख्यासंदर्भात एमआयडीसी पोलीसांची कारवाई

ताज्या बातम्या

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group