• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुर्दैवी : महिला बालकल्याण अधिकाऱ्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 14, 2024
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
दुर्दैवी : महिला बालकल्याण अधिकाऱ्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

जळगाव शहरातील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील जिल्हा परिषदेत जिल्हा कार्यक्रम अधिकारी असलेले देवेंद्र राऊत यांच्या पत्नी तथा जिल्हा महिला बालकल्याण विभागात अधिकारी असलेल्या मयुरी करपे राऊत यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी दि. १४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी त्यांच्या कॉलनीतील नागरिकांसह अधिकारी वर्गाने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.

मयुरी देवेंद्र राऊत-करपे (वय ३२, रा. श्रीराम नगर, दादावाडी परिसर,जळगाव) असे मयत महिला अधिकाऱ्यांचे नाव आहे. त्या पती देवेंद्र राऊत व २ मुलींसह राहत होत्या. देवेंद्र राऊत हे जिल्हा परिषदेत महिला बालकल्याण विभाग येथे जिल्हा कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत असून मयुरी करपे या आकाशवाणी चौकातील जिल्हा महिला बालकल्याण विभागात कार्यरत आहेत. शनिवारी दि. १४ सप्टेंबर रोजी मयुरी करपे यांनी दुपारी पती देंवेंद्र यांना एका खाजगी रुग्णालयात बीपीचा त्रास होत असल्याने त्यांना तपासण्यासाठी आणले होते.

मात्र यावेळी मयुरी करपे यांची प्रकृती खराब झाल्याने त्या कोसळल्या. त्यानंतर नातेवाईकांनी दोघं पतिपत्नीला दुसऱ्या खाजगी रुग्णालयात तातडीने हलविले. त्याठिकाणी देवेंद्र राऊत यांच्यावर उपचार सुरु आहे. तर मयुरी करपे राऊत यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. यावेळी नातेवाईकांना अश्रू अनावर झाले होते. शवविच्छेदनकामी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. श्रीराम नगरात माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांसह सरकारी अधिकाऱ्यांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतली होती. दरम्यान, राऊत यांचा परिवार अत्यंत हसता खेळता परिवार होता. त्यांच्या परिवारावर शोककळा पसरली आहे.


 

Next Post
युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ उपयुक्त – पालकमंत्री

युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' उपयुक्त - पालकमंत्री

ताज्या बातम्या

जिवंतपणी ज्येष्ठांची सेवा हेच महापुण्य; मातोश्री यमुनाई वृद्धाश्रमात साहित्याचे मोफत वाटप
जळगाव जिल्हा

जिवंतपणी ज्येष्ठांची सेवा हेच महापुण्य; मातोश्री यमुनाई वृद्धाश्रमात साहित्याचे मोफत वाटप

October 5, 2026
५८व्यांदा रक्तदान करून पै. शिवाजी पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी
Uncategorized

५८व्यांदा रक्तदान करून पै. शिवाजी पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी

October 5, 2026
एमडी ड्रग्जचा ‘किंगपीन’ अज्जू मालेगाव पोलिसांच्या रडारवर ; अजय गारुंगेला पुरवठा केल्याचे चौकशीत उघड
खान्देश

एमडी ड्रग्जचा ‘किंगपीन’ अज्जू मालेगाव पोलिसांच्या रडारवर ; अजय गारुंगेला पुरवठा केल्याचे चौकशीत उघड

October 5, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
खान्देश

रेल्वे स्थानकावर प्रकृती खालावली अन् बांगलादेशी महिलेचे बिंग फुटले

October 5, 2026
आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू
खान्देश

आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

October 5, 2026
महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add