• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ट्रक चोरी प्रकरणातील फिर्यादीसह दोघे चोरटे गजाआड

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 14, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
ट्रक चोरी प्रकरणातील फिर्यादीसह दोघे चोरटे गजाआड

वरणगाव, ता. भुसावळ : भुसावळ ते वरणगाव महामार्गावरील वेस्टर्न हॉटेलवरून रात्री चोरी गेलेल्या ट्रकप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात फिर्यादी ट्रक चालकसह पोलिसांनी अन्य दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, चोरीला गेलेला ट्रक अद्याप जप्त झाला नसल्याचे पोलिसांनी सांगीतले. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता ३ दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील ट्रकचालक अरबाज खान तस्लीम (वय २७) हा त्याच्या ताब्यातील ट्रक (एमएच ४३, वाय- ८०८७) घेऊन भुसावळ ते वरणगाव महामार्गाने जात होता. वरणगाव नजिकच्या महामार्गावरील हॉटेल वेस्टर्नसमोर ५ सप्टेंबर रोजी चालक हा रात्री थांबला होता. मात्र, रात्री हा ट्रक चोरीला गेल्याचे सकाळी चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने ही माहिती ट्रक मालकाला दिली.

याबाबत ८ रोजी वरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता ट्रक चोरीच्या घटनेतील फिर्यादी चालकच आरोपी निघाला आहे. यात पाळधी येथील अरबाज खान तस्लीम व त्याचा साथीदार क्लिनर तस्लीम अयुब खान (वय ५४) तसेच जामनेर येथील युसूफ खान अमीर (वय ४८) यांना ११ रोजी अटक करण्यात आली. मात्र, या घटनेतील चोरीला गेलेला ट्रक अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही. या प्रकरणाचा तपास पो.उ.नि. सुशिल सोनवणे करत आहेत.

Tags: Crimevarngaon
Next Post
बोरी नदीपात्रात बुडून इसमाचा मृत्यू

बोरी नदीपात्रात बुडून इसमाचा मृत्यू

ताज्या बातम्या

भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !
जळगाव जिल्हा

भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !

May 8, 2025
कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण
जळगाव जिल्हा

कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण

May 6, 2025
छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना
जळगाव जिल्हा

छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना

May 6, 2025
ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन
आरोग्य

ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन

May 5, 2025
रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी
जळगाव जिल्हा

रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी

May 4, 2025
अनैतिक संबंधाच्या वादातून झाला तरुणाचा खून ! ; २४ तासाच्या आत चार जणांना अटक
गुन्हे

अनैतिक संबंधाच्या वादातून झाला तरुणाचा खून ! ; २४ तासाच्या आत चार जणांना अटक

May 4, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group