• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आ. राजूमामा भोळे व माजी महापौर सीमाताई भोळे यांनी केले वाघूर धरण जलपूजन

दोन वर्ष शहरासाठी पाण्याची चिंता मिटली

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 4, 2024
in Uncategorized, जळगाव जिल्हा
0
आ. राजूमामा भोळे व माजी महापौर सीमाताई भोळे यांनी केले वाघूर धरण जलपूजन

जळगाव, दि.०४ (प्रतिनिधी) : जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे २२ किलोमीटरवरील वाघूर धरण यंदा वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे १०० टक्के पूर्ण भरले आहे. त्या अनुषंगाने हिंदू संस्कृतीची जपणूक करीत कृतज्ञता म्हणून आज बुधवारी शहराचे आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे यांनी सपत्निक अर्थात माजी महापौर सीमाताई सुरेश भोळे दोघांनी धरणस्थळी साडीचोळी, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून जलपूजन केले आणि परमेश्वराचे आभार मानले.

यावेळी तापी पाटबंधारे महामंडळाचे अभियंता पी. एम. पाटील, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश बोरोले, सहाय्यक अभियंता विशाल सुर्वे, तापी पाटबंधारे सहाय्यक अभियंता अजय जाधव यांच्यासह कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

याप्रसंगी आ.राजूमामा भाळे यांनी वाघूर धरण असेच यापुढेही सदैव १०० टक्के भरून या धरणाच्या पाण्यावर विसंबून असलेल्या जळगाव शहरासह जामनेर, भुसावळ तसेच अन्य परिसरातील गावांना लाभ मिळू द्यावा व सर्वत्र सुख-समृद्धी नांदावी, अशी आर्त आळवणी वरुणदेवताचरणी लीन होऊन केली.

वाघूर धरणाचे बांधकाम १९७८ मध्ये झाल्यापासून आतापर्यंत ते चार वेळा १०० टक्के भरले आहे. पुढील दोन वर्षांसाठी जळगाव शहराच्या जलसाठ्यात भर पडली असून नागरिकांची जलचिंता ही मिटली आहे.

 


 

Next Post
नार पार साठी आरपारची लढाईचा निर्धार.. – माजी खा. उन्मेश पाटील

नार पार साठी आरपारची लढाईचा निर्धार.. - माजी खा. उन्मेश पाटील

ताज्या बातम्या

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
आरोग्य

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 25, 2026
बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा
जळगाव जिल्हा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

August 25, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामातून १० गॅस सिलिंडर चोरी

August 25, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बोदवडमध्ये घरफोडी; २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

August 25, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २२ वर्षीय संशयिताला अटक

August 25, 2026
आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
खान्देश

आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

August 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add