• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बैलांसाठी साज घेण्यास गेलेल्या तरुणाला ट्रकने चिरडले !

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 3, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
बैलांसाठी साज घेण्यास गेलेल्या तरुणाला ट्रकने चिरडले !

जळके वावडदा दरम्यानची घटना

जळगाव (प्रतिनिधी ) : बैलांसाठी पोळा सणोत्सव असल्याने साज घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला भरधाव ट्रकने चिरडल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली असून घटनास्थळावरून ट्रकचालकासह क्लिनरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली असून पवन गोपाल सुर्यवंशी वय १६ रा. वसंतवाडी ता.जळगाव असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , एरंडोल-नेरी रस्त्यावर जळके येथून पवन गोपाल सूर्यवंशी (वय १७ वर्षे) व अलताफ बंन्डु तडवी (वय १९ वर्षे) हे मोटर सायकल क्रमांक एम एच १९ बी व्ही ७५३१ ने वावडदा येथे पोळा सण असल्यामुळे बैलासाठी साज घेण्यासाठी गेला होता. परतीचा प्रवास करत असताना लहु पाटील यांच्या शेताजवळ सकाळी ९:३० वाजता नेरीकडुन समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने उडवलं. यात मोटारसायकलवर मागे बसलेला पवन गोपाल सूर्यवंशी या तरुणांच्या अंगावरुन ट्रक चे चाक गेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघातग्रस्त ट्रक अर्शिद सत्तार खान ( चालक) वय वर्षे ५० हा व त्याचा किन्नर शब्बीर हजरत खान (वय २०वर्षे) घटनास्थळावरून एरंडोलच्या दिशेने पसार झाला. या घटनेची माहिती औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला मिळाल्याने त्यांनी एरंडोल पोलिस स्टेशनशी संपर्क साधला व तेथील कर्तव्यावर हजर असणारे पोलिस कर्मचारी कपिल पाटील, दत्ता ठाकरे व दिपक पाटील यांनी एरंडोल चौफुलीवर अपघात ग्रस्त ट्रक सह चालक व क्लिनर यांना ताब्यात घेतले.

यावेळी पोलीस कर्मचारी दिपक पाटील हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळते. एरंडोल या ठिकाणी जळगाव औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले, पो.हे.कॉ.स्वप्नील पाटील याचे पथक पोहोचले व ट्रकसह आरोपींना ताब्यात घेतले.

तसेच घटनास्थळी म्हसावद पोलिस स्टेशनचे पो.हे.कॉ. प्रदीप पाटील यांनी मयत तरुणाचा मृतदेह शवच्छेदनासाठी जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालय येथे पाठविण्यात आला. तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्याने आईवडीलांनी प्रचंड आक्रोश केला होता. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई रूपाला, वडील गोपाल त्र्यंबक सुर्यवंशी आणि तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे. या घटनेमुळे वसंतवाडी गावात शोककळा पसरली आहे.


 

Tags: CrimeJalgaon
Next Post
वाघूर नदीला पूर ; जिल्हाधिकारी यांनी सतर्कता बाळगण्याचे केले आवाहन

वाघूर नदीला पूर ; जिल्हाधिकारी यांनी सतर्कता बाळगण्याचे केले आवाहन

ताज्या बातम्या

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
आरोग्य

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 25, 2026
बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा
जळगाव जिल्हा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

August 25, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामातून १० गॅस सिलिंडर चोरी

August 25, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बोदवडमध्ये घरफोडी; २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

August 25, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २२ वर्षीय संशयिताला अटक

August 25, 2026
आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
खान्देश

आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

August 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add