• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बिस्कीटांमधून सव्वाशे विद्यार्थ्यांना विषबाधा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 17, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र, राज्य
0
बिस्कीटांमधून सव्वाशे विद्यार्थ्यांना विषबाधा

पैठण तालुक्यातील केकत-जळगाव येथील घटना

पैठण (वृत्तसंस्था ) ;– सव्वाशे विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार म्हणून खाऊ घातलेल्या बिस्कीटांमधून विषबाधा झाल्याची घटना पैठण तालुक्यातील केकत-जळगाव येथे सकाळी 10.30 वाजता ही घटना घडली असून यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गात शिकणाऱ्या या चिमुकल्यांवर पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या या शाळेत एकूण 296 विद्यार्थी आहेत. दररोज विद्यार्थ्यांना खिचडी व पौष्टिक आहाराचे वाटप केले जाते. मात्र आज शनिवार असल्याने खिचडीऐवजी विद्यार्थ्यांना एका प्रसिद्ध कंपनीच्या बिस्कीटांचे वाटप करण्यात आले. हे बिस्कीट खाल्ल्यानंतर अर्ध्या तासाने सुरुवातीला 50 ते 55 विद्यार्थ्यांना मळमळ व उलट्या झाल्या. थोड्याच वेळात हे विद्यार्थी तापाने फणफणले. यामुळे धाबे दणाणलेल्या शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, या विद्यार्थ्यावर उपचार सुरू असतानाच उलट्या आणि ताप आलेल्या आणखी 50 विद्यार्थ्यांची भर पडली. दुपारी 1 वाजेपर्यंत ही संख्या 122 एवढी झाली होती. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख नोमान व डॉ. बाबासाहेब घुगे उपचार करीत आहेत. तूर्तास या सर्वांची प्रकृती स्थिर असून काही घाबरण्याचे कारण नसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.


 

Tags: Crimepaithan
Next Post
‘आमदार सांस्कृतिक महोत्सवा’चे जळगावात आयोजन

'आमदार सांस्कृतिक महोत्सवा'चे जळगावात आयोजन

ताज्या बातम्या

गोदावरी लक्ष्मी बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सत्यनारायण पूजा उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी लक्ष्मी बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सत्यनारायण पूजा उत्साहात

November 13, 2026
लामणदिव्याची कलाकृती अप्रतिम.. – ॲड. नीलम शिर्के सामंत
जळगाव जिल्हा

लामणदिव्याची कलाकृती अप्रतिम.. – ॲड. नीलम शिर्के सामंत

November 13, 2026
जिल्ह्यात प्रथमच महादेव रुग्णालयात एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी यशस्वी!
आरोग्य

जिल्ह्यात प्रथमच महादेव रुग्णालयात एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी यशस्वी!

November 12, 2026
जनजातीय गौरव सेवा सप्ताहातून आदिवासींच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा – ना. गुलाबराव पाटील
जळगाव जिल्हा

जनजातीय गौरव सेवा सप्ताहातून आदिवासींच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा – ना. गुलाबराव पाटील

November 11, 2026
माणुसकीचा अनोखा उपक्रम…! वंचित मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद
जळगाव जिल्हा

माणुसकीचा अनोखा उपक्रम…! वंचित मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद

November 11, 2026
दुहेरी आघात: जावयाच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना प्रकृती ढासळल्याने सासूचीही प्राणज्योत मालवली
जळगाव जिल्हा

दुहेरी आघात: जावयाच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना प्रकृती ढासळल्याने सासूचीही प्राणज्योत मालवली

November 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add