• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

निरोगी आयुष्यासाठी रानभाज्यांचा दैनंदिन आहारात समावेश करणे गरजेचे.. आ. राजूमामा भोळे

जळगावात भरला रानभाजी महोत्सव ; ७० स्टॉलच्या माध्यमातून विविध रानभाज्या विक्री

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 10, 2024
in कृषी, खान्देश, जळगाव जिल्हा
0
निरोगी आयुष्यासाठी रानभाज्यांचा दैनंदिन आहारात समावेश करणे गरजेचे.. आ. राजूमामा भोळे

जळगाव | दि.१० ऑगस्ट २०२४ | जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून जळगाव शहरातील रोटरी भवन मायादेवी नगर या ठिकाणी कृषि विभाग, प्रकल्प संचालक (आत्मा) जळगाव व रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा)यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती.

या महोत्सवात जळगाव जिल्ह्यातील ७० शेतकरी व कृषि शेतकरी गटांनी विविध प्रकारच्या रानभाज्या, रानमेवा, रानफळे व रानभाज्यांची पाककला कृति व त्यांची विक्री करिता शहरातील नागरिकांना उपलब्ध करून दिली. निरोगी आयुष्य जगण्यासाठी रानभाज्यांचा दैनंदिन आहारात समावेश करावा तसेच पारंपारिक रानभाज्यांचे जतन होण्याकरिता प्रत्येक तालुका स्तरावर रानभाजी महोत्सव आयोजित केल्यास शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन मिळेल व नागरिकांना त्याचे महत्व कळेल अशी अपेक्षा आ. सुरेश भोळे यांनी व्यक्त केली.

नैसर्गिक रित्या बांधावर आढळणा-या विविध रानभाज्या व त्याचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश केल्याने विविध प्रकारचे अन्न घटक, जीवनसत्त्वे, खनिजे मानवी शरिररास कशा पद्धतीने उपयुक्त ठरतात याबाबत चर्चा केली. तसेच उपस्थित शेतकऱ्यांकरीता दरवर्षी या पद्धतीने महोत्सव भरवण्याचा आम्ही मागील ४ वर्षापासून प्रयत्न करीत असून यापुढे देखील शेतकऱ्यांकरीता आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी जिल्हा प्रशासन नेहमी सहकार्य करेल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना व पाककला कृति सादर केलेल्या शेतकरी व शेतकरी गटांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या महोत्सवात करटुले, अंबाडी, शेवगा, हादगा, फांग, केळफुल, रानमेथी, अळू, तांदूळजा, आघाडा, पाथरी, घोळ, कुरडू, गुळवेल इ. रानभाज्या विक्री करता ठेवण्यात आल्या होत्या.

या महोत्सवास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) दादाराव जाधवर कृषी विकास अधिकारी (जि. प.) सुरज जगताप, तालुका कृषी अधिकारी जळगाव श्रीकांत झांबरे, रोटरी क्लब ऑफ वेस्टचे अध्यक्ष विनीत जोशी, प्रकल्प प्रमुख योगेश भोळे, मानद सचिव तुषार तोतला, भद्रेश शहा व पदाधिकारी उपस्थित होते. या महोत्सवाला जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित राहून त्यांनी आपल्या रानभाज्याची विक्री केली. नागरिकांनी रानभाज्या पासून महिला गटांनी बनविलेल्या चविष्ट पदार्थाचा आस्वाद घेतल्याची माहिती विभागीय कृषि सह संचालक रविशंकर चलवदे यांनी दिली.


 

Next Post
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे दीर्घ आजाराने निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे दीर्घ आजाराने निधन

ताज्या बातम्या

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
खान्देश

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 21, 2026
नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!
जळगाव जिल्हा

नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!

August 21, 2026
अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका
गुन्हे

अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक
गुन्हे

वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक

August 21, 2026
जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने

August 20, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

August 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add