• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू

पाचोरा तालुक्यातील माहेजी जवळ घडली घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 9, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
४० लाखांची फसवणूक करणाऱ्या भामट्याच्या मुसक्या आवळल्या

जळगाव | दि. ०९ ऑगस्ट २०२४ | अहमदनगर वरून बिहार येथे दरभंगा एक्सप्रेसने घरी जात असताना पाचोरा तालुक्यातील माहिजी जवळ रेल्वेतून पडल्याने एका परप्रांतीय तरूणाचा गंभीर मार लागून मृत्यू झालायं. पोलिसांनी त्याची ओळख पटवली असून याप्रकरणी रेल्वे पोलीस दुरक्षेत्र येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अरविंद कुमार प्रेमनाथ सरदार (वय १९, रा. सुखानगर, ता. प्रतापगंज जि. सुपल, बिहार) असे मयत अरुणाचे नाव आहे. आई-वडील, एक भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे. अरविंद कुमार हा अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव येथील एका ऑइल मिल कंपनीत कामाला आहे. त्याच्यासोबत चार कामगार हे सुट्टी घेऊन नगरवरून बिहार येथे गुरुवार दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी दरभंगा एक्सप्रेसने निघाले होते.

दरम्यान दरभंगा एक्सप्रेस जळगाव जिल्ह्यात आली असता माहिजी रेल्वे स्टेशनच्या परिसरात खंबा क्रमांक ३८६/१० ते १२ दरम्यान तो अचानक रेल्वेतून खाली पडला. हे मात्र सोबतच्या कामगारांना लक्षात आले नाही. रेल्वेमध्ये गर्दी खूप असल्यामुळे ते भुसावळला उतरले. तेव्हा अरविंद कुमार दिसून आला नाही. माहिजी रेल्वे स्टेशनजवळ स्टेशन मास्तरने रेल्वे पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी अरविंद कुमारचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला होता. त्यानंतर त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू केले होते.

अरविंद कुमार याच्याजवळ आढळून आलेल्या दोन मोबाईलमुळे त्याची ओळख पटवली. त्यानुसार अरविंद कुमार यांचे जिजाजी सुनील विद्यानंद सरदार यांनी त्यास ओळखले. सदर घटनेबाबत रेल्वे दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags: CrimeJalgaon
Next Post
पुण्यात ‘द बर्निंग बसचा थरार !

पुण्यात 'द बर्निंग बसचा थरार !

ताज्या बातम्या

भुसावळात ३० हजारांची लाच मागणाऱ्या फौजदारासह खाजगी इसमावर गुन्हा; पोलीस उपनिरीक्षक फरार!
गुन्हे

भुसावळात ३० हजारांची लाच मागणाऱ्या फौजदारासह खाजगी इसमावर गुन्हा; पोलीस उपनिरीक्षक फरार!

May 29, 2026
पर्यावरण संरक्षणासाठी मोठे पाऊल: डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘झिरो डिस्चार्ज’ एसटीपी प्रकल्प कार्यान्वित
जळगाव जिल्हा

पर्यावरण संरक्षणासाठी मोठे पाऊल: डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘झिरो डिस्चार्ज’ एसटीपी प्रकल्प कार्यान्वित

May 29, 2026
विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था जागेसाठी​भाजपकडून डॉ. केतकी पाटील यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत!
जळगाव जिल्हा

विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था जागेसाठी​भाजपकडून डॉ. केतकी पाटील यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत!

May 29, 2026
जळगावच्या केळी निर्यातीला आंतरराष्ट्रीय स्तरावर चालना
कृषी

जळगावच्या केळी निर्यातीला आंतरराष्ट्रीय स्तरावर चालना

May 29, 2026
रावेर तालुक्यात मोतीबिंदू निर्मूलन अभियान अंतिम टप्प्यात
आरोग्य

रावेर तालुक्यात मोतीबिंदू निर्मूलन अभियान अंतिम टप्प्यात

May 28, 2026
कानाचा साधा संसर्ग समजू नका; डोकेदुखी ठरली दुर्मिळ आजाराचे लक्षण! डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार
आरोग्य

कानाचा साधा संसर्ग समजू नका; डोकेदुखी ठरली दुर्मिळ आजाराचे लक्षण! डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार

May 28, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group