• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू

पाचोरा तालुक्यातील माहेजी जवळ घडली घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 9, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
४० लाखांची फसवणूक करणाऱ्या भामट्याच्या मुसक्या आवळल्या

जळगाव | दि. ०९ ऑगस्ट २०२४ | अहमदनगर वरून बिहार येथे दरभंगा एक्सप्रेसने घरी जात असताना पाचोरा तालुक्यातील माहिजी जवळ रेल्वेतून पडल्याने एका परप्रांतीय तरूणाचा गंभीर मार लागून मृत्यू झालायं. पोलिसांनी त्याची ओळख पटवली असून याप्रकरणी रेल्वे पोलीस दुरक्षेत्र येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अरविंद कुमार प्रेमनाथ सरदार (वय १९, रा. सुखानगर, ता. प्रतापगंज जि. सुपल, बिहार) असे मयत अरुणाचे नाव आहे. आई-वडील, एक भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे. अरविंद कुमार हा अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव येथील एका ऑइल मिल कंपनीत कामाला आहे. त्याच्यासोबत चार कामगार हे सुट्टी घेऊन नगरवरून बिहार येथे गुरुवार दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी दरभंगा एक्सप्रेसने निघाले होते.

दरम्यान दरभंगा एक्सप्रेस जळगाव जिल्ह्यात आली असता माहिजी रेल्वे स्टेशनच्या परिसरात खंबा क्रमांक ३८६/१० ते १२ दरम्यान तो अचानक रेल्वेतून खाली पडला. हे मात्र सोबतच्या कामगारांना लक्षात आले नाही. रेल्वेमध्ये गर्दी खूप असल्यामुळे ते भुसावळला उतरले. तेव्हा अरविंद कुमार दिसून आला नाही. माहिजी रेल्वे स्टेशनजवळ स्टेशन मास्तरने रेल्वे पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी अरविंद कुमारचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला होता. त्यानंतर त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू केले होते.

अरविंद कुमार याच्याजवळ आढळून आलेल्या दोन मोबाईलमुळे त्याची ओळख पटवली. त्यानुसार अरविंद कुमार यांचे जिजाजी सुनील विद्यानंद सरदार यांनी त्यास ओळखले. सदर घटनेबाबत रेल्वे दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Tags: CrimeJalgaon
Next Post
पुण्यात ‘द बर्निंग बसचा थरार !

पुण्यात 'द बर्निंग बसचा थरार !

ताज्या बातम्या

नवविवाहितेची आत्महत्या: जळगाव तालुक्यातील लमांजन येथील घटना
जळगाव जिल्हा

नवविवाहितेची आत्महत्या: जळगाव तालुक्यातील लमांजन येथील घटना

July 14, 2025
जळगावात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन: ३७४ पेक्षा अधिक पदांसाठी भरतीची संधी
जळगाव जिल्हा

जळगावात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन: ३७४ पेक्षा अधिक पदांसाठी भरतीची संधी

July 14, 2025
टायगर ग्रुपच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी कल्पेश कोळी; शहराध्यक्षपदी विजय मोहिते
जळगाव जिल्हा

टायगर ग्रुपच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी कल्पेश कोळी; शहराध्यक्षपदी विजय मोहिते

July 14, 2025
मेहरूणमध्ये दोन कोटींच्या रस्त्याचे भूमिपूजन; नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या प्रयत्नांना यश
जळगाव जिल्हा

मेहरूणमध्ये दोन कोटींच्या रस्त्याचे भूमिपूजन; नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या प्रयत्नांना यश

July 14, 2025
बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरी करणारा जळगावचा चोरटा जेरबंद
गुन्हे

बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरी करणारा जळगावचा चोरटा जेरबंद

July 14, 2025
ग्रामीण बोलीभाषेचे संरक्षण ग्रामीण साहित्यच करतात – संमेलनाध्यक्ष डॉ. फुला बागूल
जळगाव जिल्हा

ग्रामीण बोलीभाषेचे संरक्षण ग्रामीण साहित्यच करतात – संमेलनाध्यक्ष डॉ. फुला बागूल

July 14, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group