• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गुटख्याचे वाहन परस्पर सोडून दिल्याप्रकरणी चार पोलीस निलंबीत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 9, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
गुटख्याचे वाहन परस्पर सोडून दिल्याप्रकरणी चार पोलीस निलंबीत

जळगाव | दि. ०९ ऑगस्ट २०२४ | महामार्गावरून पकडलेले गुटख्याचे वाहन परस्पर सोडून दिल्याप्रकरणी येथील पोलीस उपनिरिक्षक तसेच चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुक्ताईनगरसह परिसरातून मध्यप्रदेशातून जळगाव तसेच परिसरातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होत असते. यात काही वेळेत थातुरमातूर कारवाई वगळता मोठी कार्यवाही होत नाही. गेल्याच आठवड्यात तर थेट आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुटख्याची वाहतूक करणारी कार पकडून दिल्यामुळे हा प्रकार अजून चर्चेत आला होता. यामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच गुटखा तस्करी प्रकरणात करण्यात आलेली मोठी कारवाई ही चर्चेचा विषय ठरली आहे.

काही दिवसांपूर्वी गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर जप्तीची कारवाई करण्यात आली. यानंतर हे वाहन पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले. तथापि, यावर कोणतीही कार्यवाही न करता हे वाहन सोडून देण्यात आले. पोलीस महानिरिक्षक दत्तात्रय कराळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. मुक्ताईनगर पोलीस स्थानकात कार्यरत उपनिरिक्षक राहूल बोरकर यांच्यासह हवालदार गजानन महाजन, कॉन्स्टेबल डिगंबर कोळी व निखील नारखेडे तसेच नाईक सुरेश पाटील यांना निलंबीत केले आहे. म्हणजेच या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकाचे पाच कर्मचारी निलंबीत झाले आहेत.

Tags: CrimeJalgaonmuktainagarPolice
Next Post
जळगावातील एकाचा तापी नदी पात्रात मृतदेह आढळला

जळगावातील एकाचा तापी नदी पात्रात मृतदेह आढळला

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add