• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

झोपेत उलटी झाल्याने १६ वर्षीय मुलीचा मृत्यू

जळगावातील दुर्दैवी घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 8, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
४० लाखांची फसवणूक करणाऱ्या भामट्याच्या मुसक्या आवळल्या

जळगाव | दि. ०८ ऑगस्ट २०२४ | येथील उच्चभ्रू वस्तीतील १६ वर्षीय मुलीचा झोपेतच उलटी झाल्याने तिचा आकस्मिक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दि. ८ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजता समोर आली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जिज्ञासा नरेंद्र निकुंभ (वय १६, रा.गणपती नगर, जळगाव) असे मयत मुलीचे नाव आहे. वडिल नरेंद्र निकुंभ हे शहरातील जीएसटी विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. जिज्ञासा ही शहरातील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात अकरावीचे शिक्षण घेत होती. गुरुवारी सकाळी ६ वाजता जिज्ञासाचे क्लास असायचे. त्यासाठी पहाटे ५ वाजता जिज्ञासाची आई तिला उठविण्यासाठी गेली असता, तिचे शरीर पूर्णपणे थंड पडलेले आढळून आले. लागलीच जिज्ञासाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, उपचाराआधीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रात्री झोपेत तिच्या घशात उलटी अडकल्याने तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. जिज्ञासा अतिशय हुशार व मेहनती असल्याने, तिच्या अचानक मृत्यूमुळे आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या पश्चात आई, वडिल व लहान बहिण असा परिवार आहे. जिज्ञासाच्या नातेवाईकांनी दिलेल्या महितीनुसार रात्री १२ वाजेपर्यंत तिने अभ्यास केला होता. त्यानंतर ती झोपली, दरम्यान, तिला याआधी कोणताही आरोग्यासंबधी त्रास नसल्याचीही माहिती नातेवाईकांनी दिली. तर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील कार्यवाहीसाठी नेण्यात आला होता.

Tags: CrimeJalgaon
Next Post
४० लाखांची फसवणूक करणाऱ्या भामट्याच्या मुसक्या आवळल्या

३६ हजारांची लाच स्वीकारतांना कामगार निरीक्षक जाळ्यात

ताज्या बातम्या

एसटी प्रशासनाचा ‘रामभरोसे’ कारभार; डोळ्यासमोर बस असूनही चौकशी खिडकीतून प्रवाशांची दिशाभूल!
खान्देश

एसटी प्रशासनाचा ‘रामभरोसे’ कारभार; डोळ्यासमोर बस असूनही चौकशी खिडकीतून प्रवाशांची दिशाभूल!

January 18, 2026
जळगावात २३ जानेवारीपासून ‘बहिणाबाई महोत्सवा’चा जागर; खाद्यसंस्कृती आणि मनोरंजनाची मेजवानी
खान्देश

जळगावात २३ जानेवारीपासून ‘बहिणाबाई महोत्सवा’चा जागर; खाद्यसंस्कृती आणि मनोरंजनाची मेजवानी

January 18, 2026
“जळगावकरांचा विश्वास सार्थ ठरणार, प्रभागाचा विकास हेच आमचे ध्येय” – विष्णू भंगाळे
खान्देश

“जळगावकरांचा विश्वास सार्थ ठरणार, प्रभागाचा विकास हेच आमचे ध्येय” – विष्णू भंगाळे

January 17, 2026
आमदार भोळेंचा ऐतिहासिक करिष्मा; कर्जमुक्त महापालिका ते ‘क्लीन स्वीप’ विजय
जळगाव जिल्हा

आमदार भोळेंचा ऐतिहासिक करिष्मा; कर्जमुक्त महापालिका ते ‘क्लीन स्वीप’ विजय

January 17, 2026
भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता
जळगाव जिल्हा

भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता

January 16, 2026
जळगावकर मतदानाबाबत ‘थंडावले’; ५३.५९ टक्के मतदानामुळे राजकीय गणिते चक्रावली
जळगाव जिल्हा

जळगावकर मतदानाबाबत ‘थंडावले’; ५३.५९ टक्के मतदानामुळे राजकीय गणिते चक्रावली

January 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group