• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

३६ हजारांची लाच स्वीकारतांना कामगार निरीक्षक जाळ्यात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 8, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
४० लाखांची फसवणूक करणाऱ्या भामट्याच्या मुसक्या आवळल्या

जळगावच्या सह. कामगार आयुक्त कार्यालयातील प्रकार

जळगाव | दि. ०८ ऑगस्ट २०२४ | येथील सहकामगार आयुक्त कार्यालयात एका कामगार निरीक्षकाने मुकादम पदावरून दिलेली स्थगिती हटविण्यासाठी व त्याबाबतचा सहायक कामगार आयुक्त यांच्याकडे असलेल्या सुनावणीचा निकाल बाजूने लावून देण्याकरिता तक्रारदाराकडे ५० हजाराची मागणी केली होती. त्यापैकी तडजोडीअंती ३६ हजार रुपये स्वीकारताना या निरीक्षकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

चंद्रकांत पंडितराव पाटील (वय ५७, रा. वाघ नगर, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या कामगार निरीक्षकांचे नाव आहे. जळगावातील ५१ वर्षीय तक्रारदार हे माथाडी कामगार संघटनाचे उपाध्यक्ष व मुकादम असून तक्रारदार यांचे मित्र हे पण मुकदम होते. त्यांना मुकदम पदावरून स्थगिती देण्यात आली होती. त्याबाबत सहायक कामगार आयुक्त यांच्याकडे सुनावणी चालू होती. सुनावणीचा निकाल लावण्यासाठी मी सहायक कामगार आयुक्त यांच्याकडून निकाल लावून देतो मला ५० हजार रुपये द्यावे लागतील. त्याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे दि. ५ ऑगस्ट रोजी तक्रार दिली होती.

सदर तक्रारीची लाच मागणीची पडताळणी केली असता चंद्रकांत पाटील यांनी पंचासमक्ष तडजोडअंती ३६ हजार रुपये स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर जिल्हापेठ पोलीस स्टेशन, जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. सदर कारवाई हि पर्यवेक्षक अधिकारी पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पो.नि.एन.एन.जाधव,पीएसआय दिनेशसिंग पाटील,पो.हे.कॉ. सुरेश पाटील,पो.हे.कॉ.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ.शैला धनगर, पो.ना.बाळू मराठे,पो.कॉ.प्रणेश ठाकूर, पोना.किशोर महाजन,पो.ना. सुनिल वानखेडे, पो.कॉ.प्रदीप पोळ, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ. सचिन चाटे यांनी कारवाई केली.

 


 

Tags: CrimeJalgaon
Next Post
“मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना”; ४ लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते दिले कार्य प्रशिक्षण आदेश

"मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना"; ४ लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते दिले कार्य प्रशिक्षण आदेश

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने

August 20, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

August 20, 2026
परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील
जळगाव जिल्हा

परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील

August 20, 2026
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर
खान्देश

ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

August 20, 2026
रशियन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची साडेसात लाखांची फसवणूक; पुण्याच्या दोघांवर गुन्हा
खान्देश

रशियन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची साडेसात लाखांची फसवणूक; पुण्याच्या दोघांवर गुन्हा

August 20, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

खिर्डी बुद्रुक येथे बंद घर फोडून दीड लाखाचा मुद्देमाल लांबवला; निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल

August 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add