• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पावसाळ्यात डासांपासून आपला बचाव करा !..

आजाराचा वाहक 'डास'

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 29, 2024
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
पावसाळ्यात डासांपासून आपला बचाव करा !..

जळगाव | दि.२९ जुलै २०२४ | यंदा जून महिन्यापासूनच दमदार पावसाने हजेरी लावल्याने परिसरात आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळत आहे. परंतु, पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यात होणारे बदल, रोगट हवामान, मंदावलेली पचनशक्ती, डासांच्या उत्पत्तीत झालेली वाढ यामुळे अनेक साथीचे आजार बळावतात. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

▪️डास होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी..
डबके, टायर, प्लास्टिक चे साहित्य, नारळ इत्यादी पाणी साचण्याच्या जागेत डासांची उत्पत्ती होते. यामुळे नागरिकांनी परिसर स्वच्छता, कोरडा दिवस पाळणे आणि घराजवळ पाणी साचण्याच्या जागा नष्ट कराव्यात, जेणेकरून डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी केले आहे.

एडीस एजिप्ती डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गृहभेटीमध्ये प्रत्येक गावात घरांना भेटी देऊन कीटकशास्त्रीय सर्वेक्षण आरोग्य कर्मचारी, आशा सेविका यांच्या माध्यमातून केले जात आहे. प्रत्येक घरातील वापरण्यासाठी भरण्यात येणारे पाणी साठे तपासले जाणार आहेत. पाणीसाठ्यात डेंग्यू डासाच्या अळ्या आढळून आल्यास ती भांडी रिकामी करावी लागतात. रिकामे करता न येणाऱ्या पाणी साठ्यामध्ये टेमिफॉस किंवा ॲबेटचे द्रावण टाकले जात आहे.

डेंग्यू ताप, डेंग्यू रक्तस्रावी ताप, डेंग्यू शॉक सिंड्रोम अशा तीन प्रकारे होऊ शकते. डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून, यामुळे मृत्यू ओढवू शकतो. लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप असतो. सोबत डोके-डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, चव आणि भूक न लागणे, मळमळणे, उलट्या, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते.

▪️अशी घ्या काळजी..
१) आठवड्यातून एक दिवस सर्वांनी कोरडा दिवस पाळावा
२) घरासमोर पाणी साचू देऊ नका, घर व परिसर स्वच्छ ठेवा
३) पाण्याचे टॅंक तथा बॅरेल स्वच्छ ठेवा, टॅंक उघडे ठेवू नका
४) सायंकाळी दरवाजे, खिडक्या बंद करून ठेवाव्यात. खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात
५) झाडांच्या कुंड्यांत पाणी साचू देऊ नका. त्या ठिकाणी स्वच्छता ठेवा
६) घरातील फ्रिज, कुलरमधील पाणी वारंवार बदलावे
७) गप्पी मासे साचलेल्या पाण्यात सोडा


 

Next Post
टक्केवारी घेण्याचे आरोप सिद्ध करून दाखवा ; त्याच दिवशी राजकारणातुन संन्यास घेईल

टक्केवारी घेण्याचे आरोप सिद्ध करून दाखवा ; त्याच दिवशी राजकारणातुन संन्यास घेईल

ताज्या बातम्या

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी
गुन्हे

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न

April 16, 2026
जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप
जळगाव जिल्हा

जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप

April 16, 2026
जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

April 16, 2026
जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

April 16, 2026
आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद
गुन्हे

आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद

April 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group