• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

माजी उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी घेतली मातोश्रीवर उध्दव ठाकरेंची भेट

पाटील वाटणार १० हजार छत्री व टी-शर्ट

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 24, 2024
in राजकीय
0
माजी उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी घेतली मातोश्रीवर उध्दव ठाकरेंची भेट

जळगाव | दि.२४ जुलै २०२४ | ठाकरे गटाचे माजी उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी नुकतीच मुंबईत मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान कुलभुषण पाटील यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या शिवसेनेच्या (ठाकरे गट) छत्री व टी शर्टचे आज शिवसेना पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

पक्षाचे मशाल हे चिन्ह घराघरात पोहचविण्यासाठी याचा फायदा होईल, असा विश्वास उध्दव ठाकरे यांनी व्यक्त करत कुलभुषण पाटील यांच्या या उपक्रमाचे कौतूक केले. यावेळी त्यांनी जळगाव शहरात काम करत रहा, अशा सुचना देत राजकीय वाटचालीसाठी आर्शिवाद दिले.

उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने माजी उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्या तर्फे जळगाव शहरात १० हजार छत्री व टी-शर्टचे वाटप करण्यात येणार आहे. या छत्री व टी-शर्टवर बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे, अदित्य ठाकरे व कुलभुषण पाटील यांचे फोटो व मशालीचे चिन्ह आहे. या माध्यतातून पक्षाचे नाव व चिन्ह घराघरात पोहचिण्यास मदत होईल. नागरिकांच्या मनात मशालच आहे, यामुळे विधानसभा निवडणुकीत यश आपलेच आहे, अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी कुलभुषण पाटील यांचे कौतूक केले. यावेळी सुनिल ठाकूर उपस्थित होते.

कुलभूषण पाटील आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे जिल्ह्यातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कुलभूषण पाटील हे आगामी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत जळगाव शहर मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा असून ते निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी तयारीला देखील लागले असल्याचे बोलले जात आहे.

Next Post
आकाशवाणी चौकात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आकाशवाणी चौकात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

ताज्या बातम्या

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत; गोदावरी अभियांत्रिकीत सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत; गोदावरी अभियांत्रिकीत सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

September 13, 2026
गसच्या सभासदांची कर्जमर्यादा ५ लाखांनी वाढवली
गुन्हे

गसच्या सभासदांची कर्जमर्यादा ५ लाखांनी वाढवली

September 13, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

September 13, 2026
दिनकरनगरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
गुन्हे

दिनकरनगरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

September 13, 2026
सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव
जळगाव जिल्हा

सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव

September 13, 2026
सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट
खान्देश

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

September 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add