• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

औट्रम घाट (कन्नड) औरंगाबाद ते धुळेकडे जाणाऱ्या व येणाऱ्या दुचाकी व हलक्या लहान वाहनांसाठी आजपासून खुला

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 15, 2021
in जळगाव जिल्हा
0
औट्रम घाट (कन्नड) औरंगाबाद ते धुळेकडे जाणाऱ्या व येणाऱ्या दुचाकी व हलक्या लहान वाहनांसाठी आजपासून खुला

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 15 – औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्र-52 (जुना 211) या महामार्गावर औट्रम घाटातील साखळी क्र. 376+000 ते 390+000 मधील रस्ता 31 ऑगस्ट, 2021 रोजी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे घाटातील मार्ग खचला होता. तसेच घाटात जागोजागी दरड कोसळल्या होत्या. त्यामुळे सदरील ठिकाणी एका बाजुस दरी व दुसऱ्या बाजुस डोंगर असल्यामुळे वाहन दरीत कोसळण्याची किंवा अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने सदरील रस्ता तात्पुरता बंद करण्यात आलेला होता व वाहतुक वळविण्यात आलेली होती.

या रस्त्याची तातडीने दुरुस्ती व पाहणी करुन सद्य:स्थितीत औरंगाबाद ते धुळे वाहतुक करणाऱ्या दुचाकी व हलक्या/छोट्या वाहनांसाठी 15 सप्टेंबर, 2021 पासुन रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सद्या घाटात रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असुन अवजड वाहनांसाठी रस्ता सुरु करणे सुरक्षित नाही. त्यामुळे औरंगाबाद-धुळे वाहतुक करणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांसाठी खालील मार्गाने वाहतुक वळविण्यात आलेली आहे.

सर्व प्रकारच्या अवजड वाहनासाठी औरंगाबादकडून धुळेकडे येणारी व जाणारी जड वाहतुक ही औरंगाबाद-देवगाव रंगारी-शिऊर बंगला-नांदगांव-मालेगाव मार्गे धुळ्याकडे व औरंगाबादकडून चाळीसगावकडे येणारी व जाणारी वाहतुक ही औरंगाबाद-देवगाव रंगारी-शिऊर बंगला-नांदगांवमार्गे चाळीसगावकडे अशाप्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे. असे महाव्यवस्थापक (तांत्रीक) तथा प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Tags: कन्नड घाट
Next Post
डॉ.अनिकेत उल्हास पाटील मास्टर ऑफ सर्जरी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण

डॉ.अनिकेत उल्हास पाटील मास्टर ऑफ सर्जरी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण

ताज्या बातम्या

एकाच दिवशी चार रुग्णांवर एन्जिओप्लास्टी; गोदावरीचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अदनान अलींच्या सेवेची यशस्वी सूरूवात
आरोग्य

एकाच दिवशी चार रुग्णांवर एन्जिओप्लास्टी; गोदावरीचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अदनान अलींच्या सेवेची यशस्वी सूरूवात

June 25, 2026
जळगावात २६ जून पासून कॅरम लीगचा थरार
क्रिडा

जळगावात २६ जून पासून कॅरम लीगचा थरार

June 25, 2026
१२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी
जळगाव जिल्हा

१२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी

June 25, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात

June 24, 2026
बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
जळगाव जिल्हा

बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

June 24, 2026
कचरा डेपोवर मनपाचा वजन काटा अखेर सुरू; उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश!
जळगाव जिल्हा

कचरा डेपोवर मनपाचा वजन काटा अखेर सुरू; उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश!

June 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group