• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन इरिगेशनला प्लेक्स कौन्सिलची सहा पारितोषिके

ड्रीप इरिगेशन, पीव्हीसी फोमशीट फिटींग व होजेस विभागास निर्यात कार्याबाबत झाला गौरव

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 9, 2024
in जळगाव जिल्हा
0
जैन इरिगेशनला प्लेक्स कौन्सिलची सहा पारितोषिके

मुंबई / जळगाव | दि. ०८ जुन २०२४ | जागतिक किर्तीच्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड कंपनीला प्लास्टीक उत्पादनांच्या विविध गटातून २०२१-२२ व २०२२-२३ अशा दोन वर्षांसाठीचे प्लेक्स कौन्सिलचे एकूण सहा निर्यात पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे उपस्थित होते. यावेळी प्लेक्स कौन्सिलचे अध्यक्ष हेमंत मिनोचा, व्हॉईस चेअरमन विक्रम भदूरीया आणि उद्योजक एम ,पी तापडिया या मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा ग्रँड नेस्को सेंटर मुंबई येथे संपन्न झाला.

कृषी व कृषीपूरक उत्पादनांच्या क्षेत्रात जागतिक किर्तीची अग्रणी कंपनी जैन इरिगेशनने प्लास्टिक उत्पादनांच्या निर्यातीत उच्चांक राखत २०२१-२२ या वर्षासाठी जैन ठिबक सिंचन आणि पीव्हीसी फोमशीट या विभागांना पहिल्या क्रमांकाची पारितोषिके आणि फिटींग्ज् अॅण्ड होजेस विभागास दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. २०२२-२३ या वर्षासाठी ठिबक सिंचन आणि पीव्हीसी फोमशीट या विभागांना पहिल्या क्रमांकाची पारितोषिके आणि फिटींग्ज् अॅण्ड होजेस विभागास दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. राज्यपाल रमेश बैस यांच्याहस्ते जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी डी. एम. बऱ्हाटे, डॉ. कल्याणी मोहरीर, अतिन त्यागी आणि नरेंद्र पाटील यांनी कंपनीच्यावतीने हे पुरस्कार स्वीकारले.

भारतात प्लास्टिक उद्योगाचा महत्त्वाचा वाटा आहे. या क्षेत्रात अजून प्रगती करायची असेल तर संशोधन आणि विकास कार्यावर भर देणे आवश्यक आहे. महाविद्यालय, युनिर्व्हसिटीमध्ये प्लास्टिक विषयक अभ्यासक्रम सुरू करणे उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. यावेळी प्रमुख मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.

प्लेक्स कौन्सिल ही भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग विभागाद्वारे १९५५ मध्ये स्थापन केलेली संस्था आहे. भारतातील प्लास्टिकमधील वेगवेगळ्या क्षेत्रातील निर्यातीत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या उद्योगांना प्लेक्स कौन्सिल पुरस्कार देते. मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि.चा प्लास्टीक उत्पादनांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि निर्यातीबद्दल प्लेक्स कौन्सिलतर्फे १९९१ पासून दरवर्षी सन्मान होत आला आहे.

◾कंपनीचे संस्थापक अध्यक्ष श्रध्देय मोठेभाऊ अर्थात भवरलाल जैन यांच्या दूरदृष्टीचा हा परिपाक होय, ते म्हणत असत की, “गुणवत्तेच्या जोरावरच आपण स्पर्धेला पात्र ठरू शकतो; किंबहुना स्पर्धकांना मागे टाकू शकतो. तसेच चोखंदळ ग्राहक व बाजारपेठ आपणास जागतिक कीर्ती मिळवून देऊन अग्रस्थानी बसवू शकते.” उत्तम, उदात्त, गुणवत्तेचा ध्यास घेत भविष्यात अनेक दर्जेदार वस्तु, शेतीत प्लास्टिकल्चर कशा वापरता येईल याकडे लक्ष दिले. जैन इरिगेशनच्या कार्याला अधोरेखित करून १९९१ पासून ही पारितोषिके प्राप्त होत आहेत. कंपनीच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा, त्यांच्या कष्टाचा, समर्पण भावनेचा हा सन्मान असल्याचे मी मानतो.”
– अशोक जैन अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम लि. जळगाव


 

Next Post
बालरंगभूमी परिषद संस्कारासोबत कला शिक्षणाचे कार्य करणार – अभिनेत्री नीलम शिर्के

बालरंगभूमी परिषद संस्कारासोबत कला शिक्षणाचे कार्य करणार - अभिनेत्री नीलम शिर्के

ताज्या बातम्या

नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव
क्रिडा

नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव

January 28, 2026
पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!
जळगाव जिल्हा

पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!

January 27, 2026
जळगावच्या महापौर-उपमहापौर निवडीचा मुहूर्त ठरला; ६ फेब्रुवारीला रंगणार रणधुमाळी!
जळगाव जिल्हा

जळगावच्या महापौर-उपमहापौर निवडीचा मुहूर्त ठरला; ६ फेब्रुवारीला रंगणार रणधुमाळी!

January 27, 2026
साकरीत दोन शालेय मुलींची विहिरीत ढकलून निर्घृण हत्या; परिसरात प्रचंड तणाव
गुन्हे

साकरीत दोन शालेय मुलींची विहिरीत ढकलून निर्घृण हत्या; परिसरात प्रचंड तणाव

January 27, 2026
आमदाराचा साधेपणा! व्हीआयपी सोफा नाकारून राजूमामा भोळे बसले थेट जमिनीवर
खान्देश

आमदाराचा साधेपणा! व्हीआयपी सोफा नाकारून राजूमामा भोळे बसले थेट जमिनीवर

January 27, 2026
‘बहिणाबाई महोत्सवात’ लोकप्रतिनिधींचा गौरव; कीर्तनातून समाजप्रबोधनाची ‘भरारी’
खान्देश

‘बहिणाबाई महोत्सवात’ लोकप्रतिनिधींचा गौरव; कीर्तनातून समाजप्रबोधनाची ‘भरारी’

January 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group