• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द.. – श्रीराम पाटील

भुसावळ येथील लोकसंघर्ष समितीचा मेळावा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 19, 2024
in राजकीय
0
आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द.. – श्रीराम पाटील

भुसावळ, दि.१९ – आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून नागरीकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा विश्वास महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) रावेर लोकसभा मतदार संघातील उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिला आहे. भुसावळ येथे लोकसंघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

भुसावळ येथील माळी समाज मंगल कार्यालयात भुसावळ, मुक्ताईनगर व जामनेर या तालुक्यातील लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर लोकसंघर्ष समितीच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, शिवसेनेचे (उबाठा गट) संपर्क प्रमुख संजय सावंत, रावेर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील, जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील, मराठा सेवा संघाचे सुरेंद्र पाटील, जयश्री सोनवणे, रावेरचे पंचायत समिती माजी सदस्य दीपक पाटील, लोकसंघर्ष समितीचे सचिन धांडे, भगतसिंग पाटील, कैलास मोरे, सीताराम सोनवणे, मुस्तफा तडवी, मन्सूर तडवी गेमा बारेला, रुपसिंग बारेला, बुलंद छावा संघटनेचे प्रमोद पाटील, प्रदीप सपकाळे, नूरा तडवी, केशव वाघ उपस्थित होते.

माझ्याकडे विकासाचे व्हिजन असून सातपुड्यातील आदिवासींसह मतदार संघाचा विकास करण्यावर आपला भर राहणार आहे. सर्वच ठिकाणच्या मतदारांचा उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत असून नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे श्रीराम पाटील यांनी उपस्थितांना आश्वस्त केले. आदिवासींचे अनेक प्रश्न आजही कायम आहेत. भाजप सरकारने आदिवासींच्या प्रश्नांकडे कायमच दुर्लक्ष केले आहे. त्यासाठी सरकार बदलण्याची गरज आहे असे आवाहन यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना केले. तसेच यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी मार्गदशन केले. मेळाव्याला लोकसंघर्ष मोर्चाचे भुसावळ, जामनेर मुक्ताईनगर तालुक्यातील पदाधिकारी, विविध गावांचे सरपंच उपसरपंच, सदस्य, उपस्थित होते.

Next Post
भगवान महावीर जयंतीच्या औचित्याने ‘लुक एन लर्न’ च्या चिमुकल्यांचे उत्कृष्ट सादरीकरण

भगवान महावीर जयंतीच्या औचित्याने 'लुक एन लर्न' च्या चिमुकल्यांचे उत्कृष्ट सादरीकरण

ताज्या बातम्या

डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
जळगाव जिल्हा

डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 23, 2026
यूट्यूब चैनलच्या संपादकासह दोघांवर गुन्हा दाखल; स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा दावा भोवला
महाराष्ट्र

यूट्यूब चैनलच्या संपादकासह दोघांवर गुन्हा दाखल; स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा दावा भोवला

July 23, 2026
एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add