जळगाव दि.२१ – श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती – २०२४ द्वारा आयोजित शासनपती भगवान महावीर स्वामी यांच्या २६२३ जन्म कल्याणक महोत्सवाच्या औचित्याने ‘लुक एन लर्न व अन्य महिला मंडळा तर्फे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रस्तुती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाचे दीप प्रज्ज्वलन जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन यांच्या हस्ते तर महोत्सव समितीचे अध्यक्ष पारस राका, नयनतारा बाफना, ज्योती जैन, ताराबाई डाकलिया व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आरंभी कच्छी दशा वीसा मंडळा तर्फे नमोकार मंत्र तर जे पी पी महिला मंडळाच्या सदस्यांनी स्वागत गीत सादर केले.
‘लुक एन लर्न’ च्या सुमारे १४० लहान बालकांनी एक तास या कार्यक्रमात सहभाग घेऊन आपल्यातील छुप्या कलात्मक प्रस्तुति सादर केल्या. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, बोधप्रद कार्यक्रमातून भगवान महावीर स्वामी यांचा सुयोग्य संदेश देण्यात आला. ह्या सादरीकरणाला जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन सपत्नीक उपस्थित राहून देत सहभाग्यांना प्रोत्साहन दिले. विजेत्या स्पर्धकांना अशोक जैन, ज्योती जैन, समितीचे अध्यक्ष पारस राका, किरण बोरा, चंद्रकांता मुथा, रिना कुमट आदि मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान केले गेले.
या नंतर जैन सोशल ग्रुप, जय आनंद ग्रुप, तेरापंथ महिला मंडळ, सुशील बालिका मंडळ यांच्या धार्मिक आणि सामाजिक विषय घेवून छोटी नाटिका सादर केली. कार्यक्रमाच्या यशश्वीतेसाठी विशाल चोरड़िया, संजय रेदासनी, नरेंद्र बंब यांनी परिश्रम घेतले.