• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘सांज पाडवा’ ने केले जळगावकर रसिकांना मंत्रमुग्ध

भाऊंच्या उद्यानात कार्यक्रम झाला संपन्न

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 8, 2024
in मनोरंजन
0
‘सांज पाडवा’ ने केले जळगावकर रसिकांना मंत्रमुग्ध

जळगाव, दि.०८ – चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात “गुढीपाडवा”. मराठी नवीन वर्षाचा आरंभ. साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त. गुढीपाडवा म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल. या ऋतूचा आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या सहकार्याने स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे “सांज पाडवा” या सांगितिक मैफिलीचे आयोजनाने भाऊंच्या उद्यानात संपन्न झाला.

जळगावच्या कलावंतांनी हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व उद्घाटन म्हणून विकास तळेले (डेप्युटी रजिस्टर, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ) तसेच डॉ. मधुलिका सोनवणे (डायरेक्टर, विशारद स्किल डेव्हलपमेंट सेंटर, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ) उपस्थित होते. गुरुवंदना दीपक चांदोरकर यांनी सादर केली.

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी व उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नुपूर खटावकर यांनी केले. नववर्षाच्या स्वागतच सुरेल प्रवासाच्या या कार्यक्रमात श्रुती जोशी, ऐश्वर्या परदेशी, वरूण नेवे, अथर्व मुंडले तर साथसंगत केली प्रसन्न भुरे (तबला) राजेंद्र माने (संवादिनी) शुभम कुलकर्णी (मंजिरी) आणि निरूपण केले होते अनघा गोडबोले हे कलावंत सहभागी होते. कलावंतांचे सत्कार डॉ. विवेकानंद कुलकर्णी, अरविंद देशपांडे, दीपिका चांदोरकर यांनी केले.

सांज पाडव्यात ही गाणी सादर झाली..
तराणा आदीदेव महादेव राग यमन याने सुरवात झाली. यानंतर अनंता तुला कोण पाहू शके, त्या फुलांच्या गंधकोशी, पांडुरंग कांती, पांडुरंग नामी लागलासे ध्यास, रुणुझुणू रुणुझुणू, तू सुखकर्ता, श्री राम चंद्र कृपाळू, हे सुरांनो चंद्र व्हा, नारायणा रमा रमणा, विश्वाचा विश्राम रे, मन मंदिरा, दिल की तापीश, मी राधिका, बाजे मुरलीया, भैरवी अवघा रंग एक झाला यानंतर धन्य भाग सेवा का याने उत्तरोत्तर रंगलेल्या सांज पाडवा मैफिलीचा समारोप झाला.

Next Post
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात उभारली पाणी बचतीची गुढी

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात उभारली पाणी बचतीची गुढी

ताज्या बातम्या

‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सवात ‘शिवराय स्वारी आग्रा’चा थरार
जळगाव जिल्हा

‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सवात ‘शिवराय स्वारी आग्रा’चा थरार

April 26, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”
क्रिडा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”

April 26, 2026
लघुपटांच्या माध्यमातून बालमनावर संस्कार; ‘गंमत जंमत’चा दुसरा दिवस उत्साहात
जळगाव जिल्हा

लघुपटांच्या माध्यमातून बालमनावर संस्कार; ‘गंमत जंमत’चा दुसरा दिवस उत्साहात

April 25, 2026
जळगाव क्रिकेट लीगचा थरार: रविवारी रंगणार ‘ग्रॅण्ड फायनल’; मालिकावीराला मिळणार ‘पल्सर’
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीगचा थरार: रविवारी रंगणार ‘ग्रॅण्ड फायनल’; मालिकावीराला मिळणार ‘पल्सर’

April 25, 2026
दुचाकी अपघातात गंभीर जखमी तरुणावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

दुचाकी अपघातात गंभीर जखमी तरुणावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

April 25, 2026
JCL T-20: २४२ धावांचा डोंगर सर करत ‘अमळनेर सुहास जायंट्स’ फायनलमध्ये!
क्रिडा

JCL T-20: २४२ धावांचा डोंगर सर करत ‘अमळनेर सुहास जायंट्स’ फायनलमध्ये!

April 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group