• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राज्य बालनाट्य अंतिम फेरीत जळगावच्या तीन कलावंतांनी पटकावली पारितोषिके

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 15, 2024
in जळगाव जिल्हा
0
राज्य बालनाट्य अंतिम फेरीत जळगावच्या तीन कलावंतांनी पटकावली पारितोषिके

जळगाव, दि.१५ – बीड येथे झालेल्या २० व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत शहरातील नाट्यरंग थिएटर्सने सादर केलेल्या ‘म्हावरा गावलाय गो’ या बालनाट्यातील तीन कलावंतांना पारितोषिके मिळाली आहेत. दि. ५ मार्च ते १० मार्च या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे या राज्य बालनाट्य स्पर्धा संपन्न झाल्या.

अंतिम स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल पुणे या संस्थेच्या आभाळमाया या नाटकाला प्रथम, चिल्ड्रन्स अकॅडमी मालाड या संस्थेच्या सत्य जे विलुप्त या नाटकास द्वितीय तर साईस्पर्श संस्था ठाणे यांच्या ये गं ये गं परी या नाटकास तृतीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.

अंतिम फेरीच्या वैयक्तिक पारितोषिकांमध्ये नाट्यरंग जळगावच्या म्हावरा गावलाय गो या अमोल ठाकूर लिखीत दिग्दर्शित बालनाट्याकरिता संगीत दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक दर्शन गुजराथी यांना तर शर्वा जोशी व श्लोक गवळी यांना अभिनयाची गुणवत्ता प्रमाणपत्रे प्राप्त झाली आहेत. २० व्या बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत राज्यभरातील केंद्रावरून पारितोषिक विजेत्या ठरलेल्या २४ बालनाट्यांचे प्रयोग सादर करण्यात आले होते.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रमेश थोरात, रमेश भिसीकर, गजानन दांडगे, ज्योती रावेरकर, माणिक जोशी यांनी काम पाहिले. या विजेत्या कलावंतांचे सांस्कृतिक कार्यचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह जळगावातील रंगकर्मींतर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.

Next Post
संत ज्ञानेश्वर विद्यालयात नैसर्गिक रंग बनवण्याची कार्यशाळा संपन्न

संत ज्ञानेश्वर विद्यालयात नैसर्गिक रंग बनवण्याची कार्यशाळा संपन्न

ताज्या बातम्या

सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव
जळगाव जिल्हा

सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव

September 13, 2026
सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट
खान्देश

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

September 12, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 12, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर
कृषी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

September 12, 2026
राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
जळगाव जिल्हा

राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन

September 12, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक

September 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add