चोपडा, दि. 11 – येथील सुरमाज फाउंडेशन तर्फे नुुुकतीच एक संकल्पना राबविण्यात येत आहे. जिची सुरुवात दि.१० सप्टेंबर शुक्रवार पासून कऱण्यात आली. फाउंडेशन तर्फे गरीब, विधवा आणि गरजू महिलांना दर महिन्याला २०००, १५००, १००० तसेच ५०० रुपयां पर्यंतची मदद करण्यात येत आहे. ही रक्कम दर महिन्याला धनादेशाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
चोपडा येथील सुरमाज फाउंडेशन ही संस्था शैक्षणिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते. आणि विवीध सामाजिक कार्यांसाठी नेहमी प्रयत्नशील असते तसेच अधिकाधिक सेवा करून लोकांचे आणि समाजाचे भले करण्यासाठी प्रयत्नशील आहे. संस्थेच्या वतीने साथीच्या आजारांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे घेणे, मोफत औषधे वितरित करणे, ऑक्सिजन सिलेंडर देणे, गरिबांना रेशन किट देणे, सणांमध्ये सहभागी होण्यासाठी कार्ड वाटप करणे. वस्तू आणि पैसा देणे, सर्व धर्मांचे लोक एकाच ठिकाणी एकत्र करून. बंधुत्वाचा संदेश देण्यासाठी प्रयत्न वृक्षारोपण अशी असंख्य कामे करण्यात येतात. यावेळी फौंडेशने विचार केला की, अशी अनेक कुटुंबे आहेत ज्यांनी कोरोना मुळे तसेच साथीच्या इतर आजारामुळे त्यांच्या घरातील मुख्य सदस्य गमावले आहेत. आणि त्या कुटुंबांना घर खर्च भागवण्यासाठी, मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू विकत घेण्याची परिस्थिती नाही. सुरमाज फाउंडेशनने या कुटुंबांचे सर्वेक्षण केले. त्यांच्यासाठी दरमहा. कुटुंबाच्या गरजेनुसार धनराशी निश्चित केली. आणि त्यांना शुक्रवारी आर्थिक मदतीचे धनादेश दिले.
त्यामुळे या कुटुंबांमध्ये पुन्हा नवी आशा निर्माण झाली. या कामासाठी सुरमाज फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी उस्मान शेख, झियाउद्दीन काझी, सचिव डॉ रागीब, मोहम्मद अबुललैस, डॉक्टर मोहम्मद जुबेर आणि त्याच्या सर्व साथीदारांनी मोठे योगदान दिले. याावेळी सुरमाज फाउंडेशनचे गरीब व गरजूू महिलांनी आभार मानले.