जळगाव, दि.१३ – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त दि.१३ ते १९ फेब्रुवारी पर्यंत श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मेहरूण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाविषयी मुलांना माहिती व्हावी यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जयंती सप्ताहची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या हस्ते शिवरायांचे पुजन करुन सप्ताहला सुरुवात करण्यात आली.
सात दिवस विविध उपक्रम व स्पर्धा आयोजन करुन छत्रपती शिवाजी महाराज जयंती सप्ताह साजरा करण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराज सप्ताहची सांगता लक्षवेधी मिरवणूकिने होणार असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता सानप यांनी केले. कार्यक्रमाच्या वेळी सर्व शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचारी उपस्थित होते.