• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

संयुक्त अरब अमिरातीमधील बीएपीएस मंदिराच्या उद्गघाटन सोहळ्याचे अशोक जैन यांना निमंत्रण

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 14, 2024
in धार्मिक
0
संयुक्त अरब अमिरातीमधील बीएपीएस मंदिराच्या उद्गघाटन सोहळ्याचे अशोक जैन यांना निमंत्रण

जळगाव, दि.१४ – संयुक्त अरब अमिराती (युएई) मधील अबूधाबी येथे भव्य बीएपीएस हिंदू मंदिराचे (BAPS Temple) उद्घाटन परमपूज्य महंत स्वामीजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते आज दि.१४ फेब्रुवारीला होत आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रण जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांना प्राप्त झाले आहे. धुळे येथील स्वामी नारायण मंदिराचे प्रमुख आनंद स्वामीजी महाराज यांनी हे निमंत्रण अशोक जैन यांना प्रत्यक्ष येऊन सन्मानपुर्वक दिले. या निमंत्रणाचा स्वीकार करून अशोक जैन हे या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थितीत राहणार आहेत.

अबूधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्या दरम्यान मंदिराच्या बांधकामासाठी १३.५ एकर जमीन दान केली होती. मंदिराच्या बांधकामासाठी ४०० दशलक्ष संयुक्त अरब अमिराती दिरहम इतका खर्च झाल्याचा अंदाज आहे. अबू मुरीकाह जिल्ह्यातील बीएपीएस हिंदू मंदिर हे २७ एकरमध्ये विस्तारले आहे. बीएपीएस हिंदू मंदिर हे दगडापासून बनवलेले मध्य पूर्वेतील पहिलं पारंपरिक हिंदू मंदिर आहे.

गुलाबी राजस्थानी खडक व पांढऱ्या इटालियन संगमरवरी दगडापासून ते मंदिर बनवलेलं आहे. हे दगड भारतात कोरलेले असून त्यानंतर मंदिराच्या बांधकामासाठी अबूधाबीला नेले. मंदिराचे सात स्पायर्स प्रत्येक युएईच्या अमिरातीचे प्रतीक आहे. मंदिराच्या संकुलात अभ्यास केंद्र, प्रार्थना हॉल, थीमॅटिक गार्डन, शिक्षण क्षेत्र यांचा समावेश आहे. भूकंपाची शक्यता व तापमान बदल तपासण्यासाठी मंदिराच्या पायामध्ये १०० सेन्सर बसवण्यात आले आहेत.

▪️‘अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा अनुभवल्यानंतर अबुधाबीतील श्री स्वामीनारायण मंदीराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण प्राप्त झाले. ही हृदय पुलकित करणारी घटना असून बीएपीएस मंदिराची भव्य रचना ही भारत व संयूक्त अमिराती यांच्यातील सांस्कृतिक सौहार्दाचे व मैत्रीचा पुरावा म्हणता येईल’, अशी प्रतिक्रिया अशोक जैन यांनी व्यक्त केली.

Next Post
केळी पीक विमा अपील पात्र प्रस्तावावर कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

केळी पीक विमा अपील पात्र प्रस्तावावर कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

ताज्या बातम्या

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता
जळगाव जिल्हा

मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता

July 11, 2025
जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोठी कारवाई: १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १३४ गुन्हे दाखल
गुन्हे

जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोठी कारवाई: १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १३४ गुन्हे दाखल

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group