जळगाव, दि.१४ – यावल तहसील कार्यालयात जप्त करण्यात आलेल्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या चोरीचा प्रयत्न मंगळवारी फसला. दरम्यान वाहन बंद पडल्याने चोरट्याला तेथून पळ काढावा लागला.
मंगळवारच्या च्या पहाटे कोतवालची नाईट ड्युटी संपल्यानंतर, एका अज्ञात व्यक्तीने वाळू वाहतूक करण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांनी यापूर्वी जप्त केलेले वाहन चोरण्याचा प्रयत्न केला. तहसील कार्यालय परिसरातून वाहन चोरून नेत असताना ते पाण्याच्या टाकी जवळ अडकले त्यामुळे चोरट्याला वाहन नेणे शक्य झाले नाही त्यामुळे ते वाहन त्याने तिथेच सोडून पळ काढला.
दरम्यान वाहन चोरून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञाताचा शोध घेण्यात येत असून वाहन यावल पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आले. स्थानिक अधिकारी या घटनेचा तपास करीत असून भविष्यात तहसील कार्यालयाच्या ताब्यातील वस्तूंची सुरक्षा वाढवण्यासाठी पावले उचलली जातील. असे रावेर तालुका प्रशासनाने कळविले आहे.