जळगाव, दि. १० – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रवक्ता विभागाच्या वतीने फैजान शाह यांची युवक काँग्रेसच्या जळगाव ग्रामीण जिल्हा प्रवक्तापदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रवक्ता विभागाचे मुख्य प्रवक्ते दीपक राठोड यांनी प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मान्यतेने शाह यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे प्रभारी उदय भानु चीब, सह प्रभारी एहसान खान, सहप्रभारी रोहित कुमार यांच्या मार्गदर्शनाने व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी शुभेच्छा देत युवक काँग्रेची भुमीका ठामपणे मांडण्याची अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान शाह यांची नियुक्ती बद्दल जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, प्रभाकर सोनवणे, एन.एस यु.आय.चे प्रदेश सचिव धनंजय शिरीष चौधरी, जावेद जनाब, आशुतोष प्रदीप पवार, शोएब पटेल, मुजीब पटेल, भूपेंद्र जाधव, शेखर पाटील, जलील पटेल, संदीप सोनवणे, हाजी गफ्फार शाह, कादिर खान, असद अहमद, अनिल जंजाले, फैजपूरचे माजी नगर सेवक करीम मेंबर आदी यांनी शुभेछा दिल्या.