• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी परिषद स्थापन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 18, 2023
in जळगाव जिल्हा
0
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी परिषद स्थापन

जळगाव, दि.१८ – महाविद्यालयीन जीवनामध्ये स्टुडन्ट कौन्सिल विद्यार्थी परिषद हा एक अविभाज्य घटक म्हणून गणला जातो, कारण कौन्सिलच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षक वृंद यांचे परस्पर संबंध अधिक चांगल्या पद्धतीने जोपासले जातात व विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये या विद्यार्थी परिषदेचा (स्टुडन्ट कौन्सिल) मोलाचा वाटा असतो.

याच अनुषंगाने गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये विविध शाखांचे स्टुडन्ट कौन्सिल स्थापनेच्या समारंभाचे आयोजन दिनांक १८ ऑक्टोबर २०२३ ला करण्यात आले. या कार्यक्रमात भरत अमळकर (टेक्निकल ॲडव्हायझर, एमएसबीटीई, मुंबई), डॉ. केतकी पाटील (सदस्य, गोदावरी फाउंडेशन), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), डॉ. ईश्वर जाधव (रजिस्ट्रार) व सर्व विभाग प्रमुख तसेच शिक्षक वर्ग आणि सर्व शाखांचे विद्यार्थी उपस्थित होते.

त्यानंतर शाखा निहाय विद्यार्थी प्रेसिडेंट यांनी त्यांच्या विभागाच्या स्टुडन्ट कौन्सिलची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली व आगामी काळात त्यांच्या कौन्सिलच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचा आढावा प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दिला. त्यामध्ये निकिता बाविस्कर, हेमंत झांबरे, कोणीका पाटील, ललित पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.

कार्यक्रमाप्रसंगी डॉ. केतकी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थी दशेत असताना आपण सर्वांगीण विकास करणे गरजेचे आहे. जेणेकरून आपण एक उत्तम लीडर होऊ शकतो. त्यांनी या गोष्टींशी निगडित असलेले उदाहरणांसहित विद्यार्थ्यांना हे पटवून दिले. त्याचप्रमाणे महाविद्यालयामध्ये अशा उपक्रमांना प्राधान्य दिलं जाते. ही खूप महत्त्वाची बाब आहे असे त्यांनी नमूद केले.

भरत अमळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, पुर्वी विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म नव्हते. पण आज या माध्यमातून वर्किंग टुगेदर आणि पीयर लर्निंग गरजेचे आहे. बऱ्याच वेळेस खेड्या पाड्यातील मुलांमध्ये न्यूनगंड असतो त्यामुळे ते मागे राहतात. विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्मचा फायदा नक्कीच होतो. विद्यार्थ्यांनी वेळेवरच आपले ध्येय ठरवणे गरजेचे असते, त्याचप्रमाणे आपले स्वप्न सांगायला कधीही घाबरू नका, ते धाडसाने लोकांसमोर व्यक्त करा त्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची आहे, हे सर्व त्यांनी उदाहरणासहित विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्टुडन्ट कौन्सिलचे फॅकल्टी कॉर्डिनेटर प्रा. प्रवीण पाटील, प्रा. नेमीचंद सैनी, प्रा. आर. व्ही. पाटील, प्रा. निलेश चौधरी, डॉ. नितीन भोळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केतकी टिकले व पूर्वेश बऱ्हाटे यांनी केले. आणि आभार प्रदर्शन सिमरन कोळी या विद्यार्थिनीने केले.

Next Post
अन् शाळेच्या भिंती विद्यार्थ्यांसोबत बोलू लागल्या !

अन् शाळेच्या भिंती विद्यार्थ्यांसोबत बोलू लागल्या !

ताज्या बातम्या

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
खान्देश

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल

December 15, 2025
ज्येष्ठ-कनिष्ठ कलावंतांच्या सादरीकरणाने जळगावचा ‘बालगंधर्व’ महोत्सव ९ ते ११ जानेवारीला रंगणार!
खान्देश

ज्येष्ठ-कनिष्ठ कलावंतांच्या सादरीकरणाने जळगावचा ‘बालगंधर्व’ महोत्सव ९ ते ११ जानेवारीला रंगणार!

December 15, 2025
खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे कार्यशाळा; ४०० गॅरेज चालकांनी घेतला तंत्रज्ञानाचा लाभ!
खान्देश

खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे कार्यशाळा; ४०० गॅरेज चालकांनी घेतला तंत्रज्ञानाचा लाभ!

December 15, 2025
निमखेडीत तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अनैतिक संबंधातून खूनाचा संशय
खान्देश

निमखेडीत तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अनैतिक संबंधातून खूनाचा संशय

December 15, 2025
जळगाव गाळेधारकांचा प्रश्न विधानसभेत! आमदार सुरेश भोळेंच्या लक्षवेधीमुळे १२ वर्षांचा तिढा सुटणार?
खान्देश

जळगाव गाळेधारकांचा प्रश्न विधानसभेत! आमदार सुरेश भोळेंच्या लक्षवेधीमुळे १२ वर्षांचा तिढा सुटणार?

December 13, 2025
‘लाव रे तो व्हिडिओ’: परीट-धोबी समाजाचे मुख्यमंत्र्यांविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन
खान्देश

‘लाव रे तो व्हिडिओ’: परीट-धोबी समाजाचे मुख्यमंत्र्यांविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन

December 12, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group