• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिंडीत समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासह रक्तदान शिबिर उत्साहात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 17, 2023
in Uncategorized
0
संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिंडीत समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव, दि. १७ – विठ्ठल नामाच्या गजरामध्ये शहरातील अयोध्या नगर परिसरात संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष दिंडी व पालखी काढण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ठिकठिकाणी दिंडीचे रांगोळी काढून स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि समाज प्रबोधन किर्तन देखील उत्साहात संपन्न झाले.

महात्मा फुले बहुउद्देशीय समाज विकास संस्था, अयोध्या नगरतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अयोध्या नगर परिसरातील महादेव मंदिर येथे संत शिरोमणी सावता माळी यांच्या प्रतिमेचे पूजन शहराचे आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी नीलेश पाटील, नगरसेवक वीरेन खडके, रंजना वानखेडे, माजी नगरसेवक प्रदीप रोटे, विजय वानखेडे उपस्थित होते. यानंतर दिंडी व पालखीला सुरुवात झाली. पालखीमध्ये कलशधारी महिला तसेच पारंपारिक वेशभूषामध्ये लहान मुलांसह स्त्री-पुरुष सहभागी झाले होते.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..
मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी यशासाठी स्वतःशीच स्पर्धा करून नेहमी पुढे गेले पाहिजे. तसेच चिकाटी व जिद्दीच्या बळावर यशाच्या पायऱ्या चढ़ल्या पाहिजे असे मत आमदार राजूमामा भोळे यांनी व्यक्त केले.


रक्तदान शिबिर..
कार्यक्रमात रेड प्लस ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात २० समाज बांधवांनी रक्तदान केले. यावेळी अध्यक्ष नंदू पाटील, सचिव सुभाष माळी, उद्योजक संतोष इंगळे, रितेश माळी यांच्यासह हर्षल इंगळे, हेमंत महाजन, महेश महाजन, जयंत इंगळे, वामन महाजन, प्रशांत महाजन, कुलदीप थोरात, दिलीप बागुल, निलेश माळी, संकेत चौधरी, ज्ञानेश्वर महाजन, शरद मोरे, सचिन महाजन आदींनी परिश्रम घेतले.


 

Next Post
भरदिवसा गोळीबाराने जळगावकर हादरले

भरदिवसा गोळीबाराने जळगावकर हादरले

ताज्या बातम्या

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक
खान्देश

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

August 28, 2026
भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
गुन्हे

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी
जळगाव जिल्हा

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

August 28, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई
जळगाव जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

August 27, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

August 27, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add