• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन इरिगेशनला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 24, 2023
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
जैन इरिगेशनला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद

जळगाव, दि.२४ – जैन इरिगेशन क्रिकेट क्लबने ऑटोमोटिव्ह क्रिकेट क्लबवर २१ धावांनी विजय मिळवत मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आयोजित कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे दिमाखात विजेतेपद पटकाविले. कांदिवली येथील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सचिन तेंडुलकर जिमखाना मैदानावर झालेल्या अंतिम फेरीचा सामना जैन इरिगेशन विरूद्ध ऑटोमोटिव्ह क्रिकेट क्लब यांच्यात रंगला.

या सामन्यात जैन इरिगेशनने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १६५ धावा केल्या. त्यात १९ वर्षाखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील डावखुरा खेडाळू कौशल तांबे याने सर्वाधिक ४४ धावांचे योगदान दिले. विजयासाठी १६६ धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना ऑटोमोटिव्ह क्रिकेट क्लब ला २० षटकांत ९ बाद १४४ धावांपर्यंत मजल मारता आली. जैन इरिगेशनचा फिरकीपटू शुभम शर्मा, शशांक अत्तरदे आणि जगदीश झोपे यांनी अचूक मारा करत विजय सुकर केला.

जैन इरिगेशन क्रिकेट क्लबच्या ‘सी’ डिव्हिजनचा विजयी संघात प्रशिक्षक समद फल्ला, अमित गवांदे, यश नहार, वरूण देशपांडे, मयंक पारेख सर, शशांक अत्तरदे, सुवेद पारकर, सुरज शिंदे, प्रशिक्षक अनंत तांबवेकर, आदित्य राजन, प्रतिक यादव, शुभम शर्मा, जगदीश झोपे, सोहम पानवलकर, जय जैन, झैनीत सचदेव, कौशल तांबे, अर्थव पुजारी, रिषभ कारवा, वैभव चौगूले यांचा समावेश होता.

संक्षिप्त धावफलक – जैन इरिगेशन सीसी : २० षटकांत ८ बाद १६५, त्यामध्ये कौशल तांबे (२७ चेंडूंत ४४ धावा, २ चौकार, २ षटकार), सुवेद पारकर (२४ चेंडूत ३७ धावा, ५ चौकार), जय जैन २४; संतोष चव्हाण ३/२४, आदित्य राणे ३/२९) विजयी विरूद्ध ऑटोमोटिव्ह सीसी : २० षटकांत ९ बाद १४४. त्यामध्ये आदित्य शेमाडकर (२४ चेंडूंत ३७ धावा ६ चौकार, मनेश भोगले (२१ चेंडूत नाबाद ३२, चौकार १, षटकार २, सुशांत वाजे (१९ चेंडूत २७ धावा, २ चौकार, २ षटकार); शुभम शर्मा ३/१६, जगदीश झोपे २/२२, शशांक अत्तरदे २/२४)

Next Post
युवक काँग्रेसचे जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापकांना निवेदन

युवक काँग्रेसचे जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापकांना निवेदन

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add