• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कजगावात भरदिवसा बंदूकीचा धाक दाखवून सराफास लुटण्याचा प्रयत्न

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 12, 2023
in जळगाव जिल्हा
0
कजगावात भरदिवसा बंदूकीचा धाक दाखवून सराफास लुटण्याचा प्रयत्न

लालसिंग पाटील | भडगाव, दि. १२ – तालुक्यातील कजगाव येथे एका सराफाच्या दुकानावर बंदुकीचा धाक दाखवून दरोड्याचा प्रयत्न झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी साडे चार ते पाच वाजेच्या सुमारास घडली. स्टेशन रोड वरील बालाजी ज्वेलर्स वर दोन ते तीन अज्ञात बंदुकधारी लोक सोने खरेदीच्या बहाण्याने सराफाच्या दुकानात घुसुन बंदूक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यापाऱ्याने आरडाओरड केल्याने दरोड्याचा प्रयत्न फसला. या घटनेमुळे कजगाव परिसरात एकच खळबळ उडाली.

भर गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या खळबळजनक घटनेमुळे गावात एकच चर्चेला उधाण आले. गजबजलेल्या सराफ बाजारातील व्यापारी उमेश बोरा हे दुकानात असतांना दोन बंदुकधारी दरोडेखोर दुकानात शिरले व त्यांनी आपल्या जवळील बंदूक व्यापाऱ्याच्या दिशेने रोखली. व्यापाऱ्याने वेळीच प्रसंगवधान राखून आरडाओरड केल्याने बंदुकधारी हल्लेखोरांनी पळ काढला. सुदैवाने याघटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र भर दिवसा सराफ दुकानावर झालेला दरोड्याच्या प्रयत्नामुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, भडगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, गुन्हेशाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे यांनी पोलीस ताफ्यासह भेट देऊन पाहणी केली.

दरोडेखोरांनी गुन्ह्यात वापरलेली गाडी सापडली..
भर दिवसा बंदूकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करणारे भामटे निसटण्यात यशस्वी झाले. मात्र कजगाव पासून काही अंतरावर असणाऱ्या गावाजवळ पोलिसांना गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट गाडी मिळाली. मात्र त्यातील आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले. तर गुन्ह्यात वापरलेली गाडी देखील चोरीची असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Next Post
व्हायरस फ्री, निरोगी रोपांमुळेच उत्तम फळधारणा – इस्त्राईलचे राजदूत यअर ईशेल

व्हायरस फ्री, निरोगी रोपांमुळेच उत्तम फळधारणा - इस्त्राईलचे राजदूत यअर ईशेल

ताज्या बातम्या

जळगावातून चोरलेल्या कार मिळाल्या राजस्थानातील वाळवंटात !
गुन्हे

जळगावातून चोरलेल्या कार मिळाल्या राजस्थानातील वाळवंटात !

May 9, 2025
भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !
जळगाव जिल्हा

भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !

May 8, 2025
कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण
जळगाव जिल्हा

कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण

May 6, 2025
छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना
जळगाव जिल्हा

छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना

May 6, 2025
ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन
आरोग्य

ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन

May 5, 2025
रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी
जळगाव जिल्हा

रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी

May 4, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group