• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनुभूती निवासी स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या ‘आर्ट मेला’ प्रदर्शनाचे भाऊंच्या उद्यानात उद्घाटन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 11, 2023
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
अनुभूती निवासी स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या ‘आर्ट मेला’ प्रदर्शनाचे भाऊंच्या उद्यानात उद्घाटन

जळगाव, दि. ११ – अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचा आर्ट मेला हे प्रदर्शन त्यांच्यातील सुप्त कलागुणांचे दर्शन घडवते. ग्रामीण संस्कृती, शहरीकरण, महिलांचे संरक्षण यासह पर्यावरण हेच सर्व काही असे संदेश या प्रदर्शनातून मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्जनशिलतेला चालना देण्यासाठी प्रोत्साहन महत्त्वाचे असते ते अनुभूती निवासी स्कूल च्या व्यवस्थापनाकडून मिळत असते त्यातून अशा कलाकृतींची निर्मिती होते असे मनोगत प्रसिद्ध आर्टिस्ट नितीन सोनवणे यांनी व्यक्त केले.

अनुभूती निवासी स्कूल चे विद्यार्थ्यांकडून वर्षभरात कलेचे विविध प्रकारांचे प्रशिक्षण घेतले जाते. यातून चित्रकला, शिल्पकला, विणकाम, पॉटरी (मातीकाम), ब्लॉक प्रिंटिंग, पेपर क्राफ्ट या कलांचा अभ्यास करून त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन असलेला ‘आर्ट मेला’ चे भाऊंचे उद्यानातील वसंत वानखेडे आर्ट गॅलरी येथे दि. ११ ते १२ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन प्रसिद्ध आर्टिस्ट नितीन सोनवणे, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा अनिल जैन, जैन इरिगेशनचे अभंग जैन, प्राचार्य देबासिस दास, विजय जैन, कला शिक्षक प्रितम दास, प्रितोम खारा यांच्या हस्ते झाले. दीपप्रज्वलन झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते फित सोडून उद्घाटन करण्यात आले.

अनुभूती निवासी शाळेतील इ. ५ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या निवडक कलाकृतींचे त्यात ब्लॉक प्रिंटिंग, पेपर क्राफ्ट, पेंटीग, पॉट, विणकाम व बाटीककाम यांचे प्रदर्शन बघता येणार आहे. पेन्सील कलर,ॲक्रलिक,सॕरमिक्स नॕकेट राखू,वाॕटर कलर यासह विविध कलाकृती आर्ट मेला मध्ये पाहता येत आहे. आज प्रदर्शन स्थळी अनुभूती च्या विद्यार्थ्यांनी लाईव्ह शिल्प बनविले ते सर्वांसाठी आकर्षक ठरले.

भाऊंच्या उद्यानाच्या वेळेत म्हणजे सकाळी ५.३० ते १०.३० व संध्याकाळी ५ ते ९ वाजेदरम्यान पाहता येईल. हा ‘आर्ट मेला’ सर्वांसाठी खुला असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबर कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी स्कूलतर्फे आगळेवेगळे उपक्रम घेतले जातात. जळगावकरांनी आर्ट मेला अनुभवावा असे आवाहन अनुभूती निवासी स्कूलच्या संचालिका निशा जैन यांनी मनोगत व्यक्त करताना केले.

Next Post
कजगावात भरदिवसा बंदूकीचा धाक दाखवून सराफास लुटण्याचा प्रयत्न

कजगावात भरदिवसा बंदूकीचा धाक दाखवून सराफास लुटण्याचा प्रयत्न

ताज्या बातम्या

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
मनोरंजन

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
चोपडा पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; ७ किलो गांजासह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक
गुन्हे

चोपडा पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; ७ किलो गांजासह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

July 27, 2026
‘बोलावा विठ्ठल’ मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना
जळगाव जिल्हा

‘बोलावा विठ्ठल’ मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना

July 27, 2026
वंजारी युवा संघटनेतर्फे जळगावात २४ वा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा दिमाखात संपन्न; ११० विद्यार्थ्यांचा गौरव
जळगाव जिल्हा

वंजारी युवा संघटनेतर्फे जळगावात २४ वा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा दिमाखात संपन्न; ११० विद्यार्थ्यांचा गौरव

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
जळगाव जिल्हा

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात
शैक्षणिक

आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add