• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वंजारी महासंघातर्फे पहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमलेनाचे आयोजन

मराठी साहित्य संमलेना साहित्य चळवळीचा पाया मजबूत करेल.. - प्रा. वा. ना. आंधळे

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 22, 2022
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
वंजारी महासंघातर्फे पहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमलेनाचे आयोजन

जळगाव, दि.२२ – वंजारी महासंघातर्फे पहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमलेनाचे आयोजन २५ डिसेंबर रविवारी नशिक येथे करण्यात आले आहे. शहरातील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृहात साहित्य संमलेन होणार असून पहिल्या सत्रात उद्घाटन समारंभ असेल नंतर भोजन आणि तदनंतर कथा कथन परिसंवाद होईल. अंतिम सत्रात कवी‌ संमेलन होईल या संमेलनासाठी उद्घाटक म्हणून विदर्भ रत्न बाबारावजी मुसळे हे लाभले असुन प्रमुख पाहुणे म्हणून नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत जी गोडसे, गणेश खाडे, वंजारी महासंघ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक काकासाहेब खांबाळकर, जेष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ तुळशीदास महाराज गुट्टे आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडी च्या मार्गदर्शक साहित्यिक तथा प्रकाशक लता गुठे, साहित्य आघाडीच्या राज्य सरचिटणीस कवयित्री सिंधुताई दहिफळे, राज्य संघटक लेखक कवयित्री सुषमा सांगळे वनवे, महिला साहित्य आघाडीच्या अध्यक्ष शितल नागरे-चोले संमेलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

तसेच या संमेलनासाठी राज्यातील ज्येष्ठ तथा नवकवी साहित्यिक उपस्थित राहणार आहेत या या अनुषंगाने ग्रामीण साहित्य स्वर्गिय सुंदराबाई मुरलीधर आंधळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडी राज्यस्तरीय साहित्य रत्न पुरस्कार २०२२ देण्यात येणार आहे.

▪️वंजारी समाजाचे साहित्य संमेलन नवपिढीसाठी प्रेरणादायी ठरेल वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडी आयोजित पहिलं राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होत असुन हा क्षण साहित्य क्षेत्रासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहणयासारखा आहे आणि याचा निश्चित फायदा भविष्यातील समाज व्यवस्थेला होईल . तसेच नाथ संप्रदायातील परंपरा असणारे संत अवजीनाथ महाराज संत सद्गुरु वामनभाऊ महाराज राष्ट्र संत भगवान बाबा स्वर्गिय गोपीनाथरावज मुंडे साहेब यांच्या विचारांचा वारसा अधिक अधिक बळकट करत भविष्यातील वैचारिक मंथन आणि चिंतन होणं गरजेच आहे असं मत संमेलनाचे अध्यक्ष प्रा.वा .ना आंधळे यांनी व्यक्त केले.

Next Post
राज्यातील कोविड परिस्थितीचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

राज्यातील कोविड परिस्थितीचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू

April 9, 2026
रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध
जळगाव जिल्हा

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

April 9, 2026
सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

April 9, 2026
जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा
जळगाव जिल्हा

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

April 8, 2026
गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन
जळगाव जिल्हा

गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

April 7, 2026
दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हे

दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

April 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group