जळगाव, दि. ०६ – जळगावची रंगभमी परिवर्तन संस्थेनं ऊर्जितावस्थेत आणण्याचं मोठं काम केलंय असं मत माजी महापौर रमेश जैन यांनी मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने शनिवारी भाऊंच्या उद्यानातील एम्फी थिएटरच्या रंगमंचाचे पूजन प्रसंगी केलं. याप्रसंगी गेल्या काही वर्षांपासून परिवर्तनने राज्यभर कला महोत्सव आयोजीत करून जळगावच्या रंगभूमीचं नाव सर्वदूर नेलं असल्याने मान्यवरांनी व रंगकर्मींनी परिवर्तनचे कौतुक केलं.
मराठी रंगभूमी दिन कलावंतांसाठी प्रेरणा देणारा असतो यानिमित्त नटराज पूजन मान्यवरांच्या हस्ते भाऊंच्या उद्यानातील रंगमंचावर करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील, पुरूषोत्तम चौधरी, नारायण बाविस्कर, नगरसेवक नितीन बरडे, रंगकर्मी आणि नगरसेवक अनंत जोशी, पुनम जोशी, माजी नगरसेविका अश्विनी देशमुख, शिरीष बर्वे, ज्ञानेश्र्वर शेंडे, होरीलासिंग राजपूत, पियूष रावळ, मंजुषा भिडे, सूनीला भोलाणे, सुदीप्ता सरकार, राहुल निंबाळकर, अंजली पाटील, सोनाली पाटील आदी रंगकर्मी उपस्थीत होते.