जळगाव, दि.१९ – येथील मेहरूण परिसरातील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात फटाक्यांमुळे होणारे वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी घेतली. तसेच, फटाक्यांऐवजी पुस्तके खरेदी करून त्यांचे वाचन करू असा संकल्प केला.
फटाकेमुक्त दिवाळी उपक्रमाचे आयोजन संस्थेचे सचिव तथा उपशिक्षक मुकेश नाईक यांनी केले. फटाक्यापासून होणारे दुष्परिणामाची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका शितल कोळी यांनी सांगितली. त्यानंतर विद्यार्थ्यांना आकाश कंदील वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी दिवाळीत फटाके न फोडता पुस्तके वाचन, किल्ले बनवणे, वैज्ञानिक खेळ खेळणे असे पर्याय करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला स्वाती नाईक, आम्रपाली शिरसाट, पूनम निकम, पूजा अस्कर ,सोनाली जाधव, सेजल बोंडे, शिल्पा कोंगे, मेघा सोनवणे, योगिता सोनवणे, शितल शेजवळ आदींनी सहकार्य केले.