जळगाव, दि. २० – पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात लोकप्रिय गायिका कडूबाई खरात यांच्या भिमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाला जळगावकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. पँथर्स रिपब्लिकन पार्टी तर्फे जळगाव शहरात प्रथमच असा कार्यक्रम घेण्यात आला,
कार्यक्रमाला पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सूर्यकांता गंगाधर गाडे या अध्यक्षस्थानी होत्या. तर पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नितीन सोमा तायडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, प्रदेश कार्याध्यक्ष निवृत्ती आरुसर, प्रदेश सरचिटणीस आकाश बिऱ्हाडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शेर खान पठाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, दर्जी फाऊंडेशनचे संचालक गोपाल दर्जी, विद्या प्रबोधनीचे संचालक योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान प्रमुख मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, माजी नगराध्यक्ष शिवचरणजी ढंढोरे, विद्या प्रबोधनीचे संचालक योगेश पाटील, प्रा. सतीश मोरे, समाजसेवक संजय तायडे, यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उत्तर महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष प्रा. योगेश करंदीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष भिकन सोनवणे यांनी केले.