• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

संतप्त विद्यार्थ्यांनी गाठले आमदार कार्यालय

आमदारांनी जाणून घेतल्या समस्या

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 21, 2022
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
संतप्त विद्यार्थ्यांनी गाठले आमदार कार्यालय

गजानन पाटील | अमळनेर, दि.२१ – गेल्या कित्येक दिवसांपासून अमळनेर आगारात वेळेवर पास उपलब्ध होत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. संपूर्ण शहरात ग्रामीण भागातुन सुमारे वीस ते पंचवीस हजार विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षणासाठी रोज ये जा करतात. यात पारोळा तालुक्यातुन देखील येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पास सवलतीची व्यवस्था अमळनेर आगारातच असल्याने याठिकाणी पास काढण्यासाठी अक्षरशः झुंबड उडते.

दरम्यान अमळनेर बसस्थानकात अनियमित बसफेऱ्यांचा तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पास साठी येणाऱ्या अडचणी संदर्भांत विद्यार्थ्यांनी थेट आमदार अनिल पाटील यांचे कार्यालय गाठले व एसटीपास साठी येणाऱ्या अडचणीचा पाढा वाचला. आमदार पाटील यांनी विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेत प्रत्यक्ष बसस्थानकात विद्यार्थी व डेपो मॅनेजर यांच्याशी चर्चा करून पाससाठी एक खिडकी वाढविण्याची मागणी केली.

सध्या शाळा, कॉलेज नियमित सुरू झाल्या आहेत, अमळनेर डेपो तर्फे पास वितरित करण्यासाठी एकच खिडकी सुरू आहे. त्यामुळे शैक्षणिक सवलत पास मिळवण्यासाठी ४ ते ५ दिवस शाळा, कॉलेज बुडवून रांगेत उभे राहून सुद्धा पास मिळत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतेच, पण पास नसल्यामुळे पूर्ण भाडे खर्च करून आर्थिक भुदंड विद्यार्थ्यांना सोसावा लागतो.

आमदार पाटील यांनी केलेल्या मागणीस तात्काळ प्रतिसाद देऊन विभाग नियंत्रक श्री. जगनोर यांनी तात्काळ पास वितरित करण्यासाठी दुसरी खिडकी उघडून दिली जाईल असे आश्वासन दिले. यावेळी कामगार नेते एल. टी. पाटील, राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील उपस्थित होते.


 

Next Post
ग्रामविकासासाठी सरपंचाचे सर्वांगीण विचार करावा.. – अनिकेत पाटील

ग्रामविकासासाठी सरपंचाचे सर्वांगीण विचार करावा.. - अनिकेत पाटील

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add