जळगाव, दि.२४ – शहरातील वाल्मीकनगर हनुमान मंदिर येथे आदिवासी क्रांती सेना व नाभिक समाजातर्फे मंगळवारी श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी निमीत्ताने प्रतिमा पुजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन शनिपेठ पोलिस स्टेशनचे पोलीस निरक्षक दिलीप भागवत यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
यावेळी प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, आदिवासी क्रांती सेनेचे सस्थापक प्रमुख मोहन शंखपाळ, रवी ठाकरे, लीलामाई फॉऊडेशनचे अश्विन शंखपाळ, अरुण इंगळे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्याच बरोबर पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांचे आदिवासी क्रांती सेने तर्फे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
नाभिक समाजाचे संजय सोनवणे, दुकादार टपरी धारक संघटनेचे अध्यक्ष रमेश महाले, समाजिक कार्यकर्ते मोहन श्रीखंडे, चेतन फुलपगारे, भूषण सोनवणे, रवी वाघ, शरद आमोदकर, नरेंद्र सोनवणे, राजू आमोदकर, शंकर सूर्यवंशी, लीलाधर सोनवणे, विजय मोरे, बापू सोनगिरे, गुलाबराव सोनवणे, दिलीप तांदूळकर तसेच वाल्मिक नगर, कांचन नगर परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.