जळगाव, दि. १९ – पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असलेल्या सर्व छायाचित्रकार बांधवांना एकत्रित आणत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनच्या कामांची आमदार राजूमामा भोळे यांनी भरभरून स्तुती केली. प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनच्यावतीने शुक्रवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी पत्रकार भवन येथे आमदार राजूमामा भोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक फोटोग्राफी दिवस साजरा करण्यात आला. कॅमेऱ्यांचे मान्यवरांच्याहस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर आ. राजूमामा भोळे, पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अशोक भाटिया, प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनचे अध्यक्ष हेमंत पाटील जळगावकर, ज्येष्ठ छायाचित्रकार पांडुरंग महाले आदी उपस्थित होते. छायाचित्रकार आणि पत्रकारांना मार्गदर्शन करतांना आ. राजू मामा भोळे यांनी पत्रकारांनी छायाचित्र काढतांना काळजी घ्यावी, असे आवाहन करीत छायाचित्रकारांना १० लाखांचा आरोग्य विमा देण्याचे आश्वासन यावेळी दिले.
छायाचित्रकारांनी रस्ता सुरक्षेविषयी काळजी घेऊन इतरांना मार्गदर्शन करावे – श्याम लोही
छायाचित्रकार हे स्वताच्या जीवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून फोटोग्राफी करीत असतात. रात्री अपरात्री घटनेची माहिती कळताच ते घटनास्थळी धाव घेतात. त्यांनी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करून रस्ता सुरक्षाविषयीचे नियम पाळून इतरांनाही हे नियम आचरणात आणण्यास प्रबोधन करावे असे प्रतिपादन जळगावचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी आज जागतिक छायाचित्रदिनानिमित्त पत्रकार भवन येथे बोलताना केले. याप्रसंगी प्रास्ताविक सुमित देशमुख यांनी मांडले. सूत्रसंचालन संघटनेचे सचिव अभिजित पाटील यांनी तर आभार सहसचिव संधींपाल वानखेडे यांनी मानले.
आणि सभागृहात हशा पिकला..
दरम्यान आ. राजूमामा भोळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना छायाचित्रकारांनी उथळपणा न करता याकडे दुर्लक्ष करण्याविषयी आवाहन करताच सूत्रसंचालक अभिजित पाटील यांनी त्यांना जळगावकर नागरिक हे दुर्लक्ष आणि डोळेझाक करीत असतात असे मिश्किल उत्तर दिल्याने सभागृहात एकच हंशा पिकला .
सुरेल गीतांनी वाढवली कार्यक्रमाची रंगत..
पत्रकार भगवान सोनार यांनी यावेळी कार्यक्रमात आपल्या सुंदर आवाजात गाणे सादर केले त्यास उपस्थित सर्व छायाचित्रकार बांधवांसह मान्यवरांनी देखील भरभरून असा प्रतिसाद दिला.
त्याचप्रमाणे कार्यक्रमाला फाऊंडेशनचे सचिव अभिजीत पाटील, उपाध्यक्ष सचिन पाटील, सहसचिव संधीपाल वानखेडे, खजिनदार प्रकाश लिंगायत, सुमित देशमुख, अरुण इंगळे, भूषण हँसकर, आबा मकासरे, गोकुळ सोनार, शैलेंद्र सोनवणे, रोशन पवार ज्येष्ठ छायाचित्रकार शब्बीर सय्यद, अतुल वडनेरे, संजय वडनेरे, वैभव धर्माधिकारी, राजेंद्र हरिमकर, संदीप होले, राहुल शिरसाळे, रजनीकांत पाटील, सचिन गोसावी, काशिनाथ चव्हाण, चित्रनिश पाटील, योगेश चौधरी, बंटी बारी, निखील सोनार, मतीन सय्यद, सुमित पाचपांडे, तेजस भंगाळे आदी छायाचित्रकार उपस्थित होते.