• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 25, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!

जळगाव, (प्रतिनिधी) : बुऱ्हाणपूर येथील मसाला व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्यांना अडवून ८ लाख रुपयांची बॅग लुटणाऱ्या टोळीचा रावेर पोलिसांनी छडा लावला आहे. गुन्हे शोध पथकाने अत्यंत शिताफीने तपास करत ७ संशयित आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून रोख रक्कम आणि दुचाकी असा एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बुऱ्हाणपूर येथील मसाला व्यापारी दीपक सुरेश धर्माणी यांचे कर्मचारी गौरव वाघ आणि तौफिक तेली हे दि.६ फेब्रुवारी २०२६ रोजी सावदा, फैजपूर आणि रावेर परिसरातून वसुली करून परतत होते. रात्री ९ वाजेच्या सुमारास खानापूर आरटीओ बॅरेलजवळ ८ ते ९ अज्ञात इसमांनी त्यांची दुचाकी अडवून पैशांची बॅग हिसकावून नेली होती. याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाला तपासाचे आदेश दिले. घटनास्थळी अंधार असल्याने आणि सीसीटीव्हीमध्ये चेहरे स्पष्ट दिसत नसल्याने तपासात अडचणी येत होत्या. पोलिसांनी रावेर, सावदा आणि फैजपूर परिसरातील तब्बल ६७ सीसीटीव्ही फुटेज तपासले. खबऱ्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

​अटक करण्यात आलेल्या संशयीतांमध्ये फारुख शेख रईस ( वय १९), अत्ताउल्लाह खान दाउद खान ऊर्फ सोनू,  शेख सईद शेख कादर ऊर्फ सुपडू, शेख समीर शेख कलीम ऊर्फ विकू, राहील खान दाउद खान, रहेमान खान अय्युब खान ऊर्फ भुन्ऱ्या, अक्रम खान इस्माईल खान (सर्व रा. बंडू चौक, रावेर) यांचा समावेश आहे.


​या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि सराईत गुन्हेगार शेख हसन शेख अफजल ऊर्फ हसन फावड्या (रा. रुस्तम चौक) हा पोलिसांचा सुगावा लागताच फरार झाला आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ९५ हजार रुपये किमतीच्या दोन मोटार सायकली आणि २ लाख ५५ हजार रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. न्यायालयाने आरोपींना २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

​ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. डॉ. विशाल जयस्वाल, पीएसआय तुषार पाटील आणि रावेर गुन्हे शोध पथकातील सुनील वंजारी, कल्पेश आमोदकर, श्रीकांत चव्हाण व सहकाऱ्यांनी केली आहे.


 

Tags: CrimeJalgaonPoliceRaver
Next Post
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

'अनुभूती'च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

ताज्या बातम्या

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक
खान्देश

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

August 28, 2026
भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
गुन्हे

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी
जळगाव जिल्हा

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

August 28, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई
जळगाव जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

August 27, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

August 27, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add