• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाातर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वितरण

सामाजिक क्षेत्रासह शैक्षणिक क्षेत्रात पत्रकार संघाचे मोठे योगदान - महापौर जयश्री महाजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 5, 2022
in जळगाव जिल्हा
0
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाातर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वितरण

जळगाव, दि. ०५ – पत्रकार म्हणजे समाजातील अतिशय महत्त्वाचा घटक असून राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातला मोठा दुवा म्हणून पत्रकारांकडे बघितले जाते. बातमीच्या धावपळीच्या युगामध्ये सर्वसामान्यांना मदत व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रमाणात मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. पत्रकारांची संघटना देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक मदत देऊ शकते ही मोठी अभिमानाची बाब असून उल्लेखनीय कार्य आहे असे प्रतिपादन महापौर जयश्री महाजन यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज जळगावातील अल्पबचत भवन येथे पत्रकारांच्या पाल्यांना व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पत्रकार संघाकडून गोरगरिबांना शैक्षणिक आधार देण्याचा प्रयत्न – आ. सुरेश भोळे
जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी आपल्या मनोगतामध्ये पत्रकार संघाकडून विविध सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला जातो याचा मी स्वतः साक्षीदार असून पत्रकार संघाच्या सामाजिक कार्यात जे काही सहकार्य लागलं ते आम्ही करीत राहू गोरगरिबांना शैक्षणिक आधार देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून होतो आहे, हे कौतुकवास्पद आहे. असे प्रतिपादन आमदार सुरेश भोळे यांनी केले आहे.

सहाशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप..
एकूण सहाशे विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले. यामध्ये स्कूल बॅग कंपास पेटी, पाणी बॉटल, पेन्सिल किट व लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, उद्योजक सागर चौबे, मंगळग्रह मंदिर संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, राजपूत करणी सेनेचे राज्य उपाध्यक्ष प्रविण पाटील, उच्च शिक्षण विभागाचे अधिकारी गणेश वळवी, जैन उद्योग समूहाचे मीडिया विभाग प्रमुख अनिल जोशी, पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा आदी मान्यवर उपस्थित होते.

शालेय साहित्य वाटापा करिता जैन उद्योग समूहाने वह्या उपलब्ध करून दिल्या तर समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून सदर कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक भूषण महाजन यांनी तर सूत्रसंचालन कमलेश देवरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शरद कुळकर्णी, दीपक सपकाळे, गोपाळ सोनवणे, विजय गाढे, संजय चौधरी, प्रमोद सोनवणे, संजय चौधरी, महेंद्र सूर्यवंशी, विनोद कोळी, रोहन पाटील, चेतन निंबोळकर यांनी सहकार्य केले.


 

Next Post
राखी प्रात्यक्षिक कार्यशाळेत पालकांचा उत्स्फूर्त सहभाग

राखी प्रात्यक्षिक कार्यशाळेत पालकांचा उत्स्फूर्त सहभाग

ताज्या बातम्या

गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी जळगावात वाहतुकीत मोठे बदल
खान्देश

गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी जळगावात वाहतुकीत मोठे बदल

September 23, 2026
मावशीच्याच घरावर भाच्याचा डल्ला; २४ तासांत दोघे जेरबंद
खान्देश

मावशीच्याच घरावर भाच्याचा डल्ला; २४ तासांत दोघे जेरबंद

September 23, 2026
रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये अधिक नफ्याचे अमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक

September 23, 2026
गिरणा नदीकाठी अवैध गावठी हातभट्टीवर धाड; ३० हजारांचे रसायन जागीच नष्ट
गुन्हे

गिरणा नदीकाठी अवैध गावठी हातभट्टीवर धाड; ३० हजारांचे रसायन जागीच नष्ट

September 23, 2026
पती जेवणासाठी बाहेर गेले असताना १८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
गुन्हे

पती जेवणासाठी बाहेर गेले असताना १८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

September 23, 2026
वॉटर मीटरच्या सदोष कारभारावरून महापौरांनी केली कंत्राटदाराची कानउघाडणी
जळगाव जिल्हा

वॉटर मीटरच्या सदोष कारभारावरून महापौरांनी केली कंत्राटदाराची कानउघाडणी

September 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add