• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रोजनदारीने काम करणार्‍या तरुणाची पीएसआय पदापर्यंत झेप

खिर्डीच्या पीएसआय गणेश कोळी यांची प्रेरणादायी कहाणी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 25, 2021
in शैक्षणिक
0
रोजनदारीने काम करणार्‍या तरुणाची पीएसआय पदापर्यंत झेप

जळगाव, दि.25- लहानपणापासूनच मिळेल ते काम करण्याची आवड.. सतत काहीतरी नविन शिकण्याची जिज्ञासा.. या जिज्ञासेतूनच १४० रुपये रोजाने कामासाठी येणार्‍या गणेश कोळी या तरुणाने वेळेचा सदुपयोग करत थेट पीएसआय पदापर्यंत घेतलेली झेप ही निश्‍चितपणे आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

जळगाव तालुक्यातील खिर्डी या छोट्याशा गावातील रहिवासी असलेले शालिक कोळी ह्यांचा एकुलता एक मुलगा गणेश कोळी हे आज जळगावात सायबर सेल विभागात पीएसआय म्हणून कार्यरत आहे. पीएसआयपर्यंतच्या या प्रवासाबाबत गणेश कोळी यांनी गोदावरी साप्ताहिकाशी दिलखुलास संवाद साधला. गणेश कोळी यांनी संवाद साधतांना सांगितले की, माझ्या आयुष्यात कुठलीही गोष्ट मी ठरवून केली नाही, सर्वकाही अनपेक्षितपणे घडत गेले आणि त्याचा स्विकार मी केला. लहानपणापासून मिळेल ते काम करण्याची आवड होती. यात सायकलवरुन किराणा विकणे, रोजाने कामाला जाणे, टिव्ही, मोबाईल रिपेअरिंग करणे असे कोर्सेस करुन ग्रामस्थांना सेवा देणे असा माझा नित्यक्रम असायचा.

भुसावळ येथील तु.स.झोपे शाळेतून माझ चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण झाले, त्यानंतर नशिराबाद येथील शाळेतून मी पुढील शिक्षण घेतले. कला शाखेतून पदवी संपादन करण्यासाठी मी जळगाव येथील एम.जे.कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. दरम्यानच्या काळात मी गोदावरी फाऊंडेशन येथे १४० रुपये रोजाने कामाला लागलो, त्यावेळी अन्नपूर्णालयमचे राजपुरोहित डी.टी.राव सर यांनी मला सांगितले की, तु हुशार आहेस, स्पर्धा परिक्षा दे, त्यासाठी अभ्यास करण्यासाठी वेळेची अ‍ॅडजस्टमेंट करुन दिली. त्यानुसार मी स्पर्धा परिक्षांचा अभ्यास सुरु केला, त्यात पहिल्याच प्रयत्नात मी तलाठी पदाची परिक्षा पास झालो आणि जामनेर तालुक्यातील ढालगाव येथे २०१० मध्ये मी तलाठी होतो. त्यानंतरही मी अभ्यास सुरुच ठेवला. पीएसआय पदासाठी मी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेली परिक्षा दिली आणि त्यातही उत्‍तीर्ण झालो. सर्वप्रथम २०१५ मध्ये पालघर येथे माझी पोस्टिंग झाली. नंतर नाशिक आणि २०१९ पासून जळगाव येथील सायबर सेल येथे कार्यरत आहे. जळगाव जिल्ह्यातील सायबर सेलशी संबंधित कामे आमच्या विभागामार्फत केली जातात.

आयुष्यात वेळ ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, एक एक सेंकदही वाया जावू नये असे वेळापत्रक करावे. तुम्हाला ज्याही गोष्टीची आवड आहे त्यात तुम्ही स्वत:ला झोकून द्या. कुठलेही काम लहान किंवा मोठे नसते, फक्‍त तुम्ही ते कसे करतात, त्यावर त्या कामाचे यश, अपयश अवलंबून असते. त्यामुळे तरुणांनो, वेळेचा सदुपयोग करा असा संदेश पीएसआय गणेश कोळी यांनी दिला.

यावेळी पीएसआय गणेश कोळी यांचा सत्कार गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जळगाव खुर्दचे उपसरपंच दिनेश पाटील, प्रशासन अधिकारी आशिष भिरुड उपस्थित होते.


Tags: Jalgaon newsKhandesh PrabhatPolicePsi
Next Post
अट्टल मोटरसायकल चोरटा अडकला स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

अट्टल मोटरसायकल चोरटा अडकला स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

ताज्या बातम्या

सायबर पोलिसांची मोठी कारवाई; साडेबारा लाखांचे ६२ गहाळ मोबाईल हस्तगत, मूळ मालकांना केले वाटप
खान्देश

सायबर पोलिसांची मोठी कारवाई; साडेबारा लाखांचे ६२ गहाळ मोबाईल हस्तगत, मूळ मालकांना केले वाटप

October 18, 2025
सर्वसामान्य जनतेची कामे करणारे आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद – पालकमंत्री गुलाबराव पाटील
खान्देश

सर्वसामान्य जनतेची कामे करणारे आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

October 18, 2025
सुरक्षित दिवाळीसाठी जळगाव पोलीस दलाचे जाहीर आवाहन; ‘सुरक्षितता’ व ‘सावधानता’ जपा!
खान्देश

सुरक्षित दिवाळीसाठी जळगाव पोलीस दलाचे जाहीर आवाहन; ‘सुरक्षितता’ व ‘सावधानता’ जपा!

October 17, 2025
बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल
खान्देश

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

October 16, 2025
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त
खान्देश

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

October 16, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group