• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वृक्षलागवडीसह वृक्षसंगोपन करून हरित जळगावचे ध्येय गाठू – विद्या गायकवाड, आयुक्त

मास्टर कॉलनीतील मनपा उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 15, 2022
in जळगाव जिल्हा
0
वृक्षलागवडीसह वृक्षसंगोपन करून हरित जळगावचे ध्येय गाठू – विद्या गायकवाड, आयुक्त

जळगाव, दि.१५ – ‘निसर्गावरील मानवी अतिक्रमणामुळे निसर्गचक्र बिघडले आहे. त्यामुळेच कधी अतिवृष्टी, कधी कोरडा दुष्काळ, कोरोनासारख्या महामारी अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे निसर्गाची जपणूक करणे आणि हरित सुंदर करणे यासह वृक्ष संवर्धनाचा वारसा पुढील पिढीला संस्कारित करणे. यासाठी वृक्ष लावणेच नाहीतर त्यांचे संगोपण करणे ही काळाची गरज आहे. असे सांगत हरित जळगावचे ध्येय झाडे जगवूनच गाठता येईल, यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठानतर्फे सुरू असलेल्या वृक्षसंवर्धनाच्या चळवळीत जळगावकरांनी सहभागी होण्याचे आवाहन महानगरपालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनी केले.

मेहरूणमधील मास्टर कॉलनी परिसरातील मेमन हाजी इब्राहीम रानानी मनपा उर्दू प्राथमिक शाळा क्र. ३६ व ५६ आणि मनपा उर्दू माध्यमिक शाळा क्र.१ येथील वृक्षारोपणाप्रसंगी आयुक्त वर्षा गायकवाड बोलत होत्या. याप्रसंगी जैन इरिगेशनच्या पर्यावरण विभागातील सहकारी अतिन त्यागी, अनिल जोशी, अजय काळे, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. जमील देशपांडे, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे हेमंत बेलसरे, मुफ्ती हारून शेख, नगरसेवक रियाज बागवान, सुन्ना बी राजू पटेल, युसूफ हाजी, मतिन पटेल, संदीप पाटील, फहीम पटेल, अक्रम देशमुख, शाहीद सय्यद उपस्थित होते.

दोघंही शाळेतील जवळपास १३०० विद्यार्थ्यांनी झाडे जगविण्याचा निर्धार केला. झाडे लावण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. निंब, करंज, वड, गुलमोहर, रेन ट्री अशा विविध जातीची १२० च्यावर रोपांची लागवड शाळेत करण्यात आली. मुफ्ती हारून यांनी कुराणमधील दाखले देत वृक्षसंवर्धनाचे महत्त्व मुलांना समजून सांगितले. ज्याप्रमाणे मनुष्य त्याचप्रमाणे वृक्ष सांभाळले गेले पाहिजे असेही ते म्हणाले.

यावेळी मुख्याध्यापक शे. नईमोद्दीन अमीनोद्दीन, मुख्याध्यापक शे. कुरबान तडवी, उपमुख्याध्यापक शे. मो. अलीम यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी नियोजनासह सहभाग घेतला. जैन इरिगेशनच्या नर्सरी विभागातील सहकारी मंगलसिंग राठोड, रविंद्र सपकाळे, शंकर गवळी यांच्यासह सहकाऱ्यांनी सहकार्य केले. शे. मो. अलीम यांनी सूत्रसंचालन केले. शे. नईमोद्दीन अमीनोद्दीन यांनी आभार मानले.


 

Next Post
गांधी रिसर्च फाऊंडेशनचा अभ्यासक्रम समाजाशी समरस करणारा.. – डॉ. सुदर्शन अय्यंगार

गांधी रिसर्च फाऊंडेशनचा अभ्यासक्रम समाजाशी समरस करणारा.. - डॉ. सुदर्शन अय्यंगार

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add