• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ए.टी.झांबरे विद्यालयात गुरुपौर्णिमा दिवस साजरा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 13, 2022
in शैक्षणिक
0
ए.टी.झांबरे विद्यालयात गुरुपौर्णिमा दिवस साजरा

जळगाव, दि.१३ – ‘जगद्गुरु महर्षी वेदव्यास’ यांच्या जयंतीनिमित्त ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखिल आषाढ शुक्ल पौर्णीमेला कथाकथन, गुरुवंदना व्दारे कृतज्ञता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते के.सी.ई सोसायटी चे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर यांनी मानव जीवनात गुरुची महती या विषयी व्याख्यानातून गुरु चे महत्व प्रतिपादन करुन विद्यार्थ्यांना आदर्श गुरुभक्ती चा मंत्र दिला. दरम्यान विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांनी मुलांना गुरुभक्तीचा वसा घ्यावा. असा उपदेश केला.

सदर कार्यक्रमात एकूण १० विद्यार्थ्यांनी गुरुशिष्य परंपरेतील गुरुभक्ती व श्रध्दा यावर आधारित कथाकथन  करुन गुरुजनांप्रती कृतज्ञता व आदरभाव व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिक वेदप्रकाश आर्य यांनी केले. शेवटी उपशिक्षिका पी.आर. कोल्हे यांनी आभार प्रदर्शन करुन कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे पर्यवेक्षक एन बी पालवे, कलाशिक्षक सतीश भोळे, व्ही. बी. मोरे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. तसेच प्रत्येक वर्गात वर्गशिक्षकांचे विद्यार्थ्यांकडून प्रातिनिधिक स्वरूपात पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन दामोदर चौधरी व सृष्टी कुलकर्णी इयत्ता आठवी च्या विद्यार्थ्यांनी केले.

Next Post
मेहरूण तलाव परिसरात दोन हजार वृक्षांचा मियावाकी प्रकल्प

मेहरूण तलाव परिसरात दोन हजार वृक्षांचा मियावाकी प्रकल्प

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add