• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गॅस्ट्रोस्कोपी तपासणी सेवा आता डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपलब्ध

हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील यांच्या हस्ते गॅस्ट्रोस्कोपी युनीटचे लोकार्पण

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 20, 2022
in आरोग्य
0
गॅस्ट्रोस्कोपी तपासणी सेवा आता डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपलब्ध

जळगाव, दि.२० – येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात हृदयविकार तज्ञ डॉ. वैभव पाटील यांच्या हस्ते गॅस्ट्रोस्कोपी युनीटचे लोकार्पण करण्यात आले. आता डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात वैद्यकीय तज्ञांकडून गॅस्ट्रोस्कोपीची तपासणी सेवा रूग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अन्ननलिका, जठर, आद्यांत्र यांची एंडोस्कोपीद्वारे केल्या जाणार्‍या तपासणीला गॅस्ट्रास्कोपी म्हणतात.

वारंवार होणारा पित्ताचा त्रास,अन्नग्रहण केल्यानंतर छातीत होणार्‍या वेदना, भोजनानंतर ढेकरा बरोबर अन्नाचे अंश येणे, संडासच्या तपासणीमध्ये रक्ताचे अंश आढळणे, जठराचा कर्करोग, जठराच्या झडपांची तपासणी, जठराची सुज, आद्यांत्रमधील सुज किंवा अडथळे, स्वादुपिंडचे काही आजार, रक्ताच्या उलट्या होणे, कारण स्पष्ट नसताना आढळणारे रक्तपांढरी बेरियम मील तपासणी काही आक्षेपार्ह आढळल्यास, अन्ननलिकेतील दोष, अन्ननलिकेतील वाढलेल्या रक्तवाहिन्यांची शस्त्रक्रिया, अन्ननलिकेत अडकलेल्या वस्तु काढण्याकरिता गॅस्ट्रोस्कोपी ही तपासणी केली जाते.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात या सर्व तपासण्यांसाठी स्वतंत्र गॅस्ट्रोस्कोपी युनीटचे लोकार्पण डॉ. वैभव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. भूषण चोपडे, नर्सिंग महाविद्यालयाचे संकेत पाटील, मनीषा खरात, किर्ती पाटील, सर्जरीचे निवासी डॉ. श्रेयस सोनवणे, डॉ. अनिश जोशी, मेडीसीनचे निवासी डॉ. समाधान बाहेकर, डॉ. सुशील लंगडे, डॉ. आदीत्य नांदेडकर, डॉ. जुनेद कामेली, डॉ. प्रियंका भालके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. खान्देशातील रूग्णांनी गॅस्ट्रोस्कोपी युनीटचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय प्रशासनाने केले आहे.

Next Post
स्व.वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

स्व.वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

ताज्या बातम्या

गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव’ उत्साहात संपन्न!
जळगाव जिल्हा

गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव’ उत्साहात संपन्न!

June 20, 2026
गोदावरी फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयात २१जून रोजी ’आंतरराष्ट्रीय योग दिन’चे आयोजन
आरोग्य

गोदावरी फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयात २१जून रोजी ’आंतरराष्ट्रीय योग दिन’चे आयोजन

June 20, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात पालक-शिक्षक सभेचे आयोजन
जळगाव जिल्हा

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात पालक-शिक्षक सभेचे आयोजन

June 20, 2026
विकसित भारत रोजगार योजना’ अंतर्गत २,४०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान वितरित
जळगाव जिल्हा

विकसित भारत रोजगार योजना’ अंतर्गत २,४०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान वितरित

June 20, 2026
पोलिसांची मोठी कारवाई; मुक्ताईनगर तालुक्यात ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ अंतर्गत यशस्वी ‘सर्जिकल स्ट्राईक’!
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; मुक्ताईनगर तालुक्यात ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ अंतर्गत यशस्वी ‘सर्जिकल स्ट्राईक’!

June 19, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात जटील पध्दतीच्या हृदय शस्त्रक्रियांसाठी डॉ. अदनान अली यांची सेवा उपलब्ध
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात जटील पध्दतीच्या हृदय शस्त्रक्रियांसाठी डॉ. अदनान अली यांची सेवा उपलब्ध

June 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group