• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

खान्देश एक मोठा परिवर्तनाचा वारसा – खा.सुप्रिया सुळे

लोकसंघर्ष मोर्चा आयोजित खान्देशस्तरीय विचार संवाद परिषदेत प्रतिपादन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 17, 2022
in सामाजिक
0
खान्देश एक मोठा परिवर्तनाचा वारसा – खा.सुप्रिया सुळे

धुळे, दि.१७ – महाराष्ट्रातील समृद्ध, संस्कृतीचा वारसा असणाऱ्या खान्देशातील शिक्षण, आरोग्य, पाणी, रोजगार, वनसंवर्धन असे अनेक महत्त्वाचे प्रश्न व त्याविषयीच्या इथे असणाऱ्या समस्या वेदनादायी आहेत मानवी विकास निर्देशांकात हे जिल्हे अति मागासलेले आहेत आदिवासी बहुल व ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने विकास अपेक्षित आहे परंतु जोपर्यंत या विकास आराखड्याला योग्य दिशा, आर्थिक पाठबळ, आणि कृतीची जोड मिळत नाही, आदिवासी बांधवाना रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे स्थलांतर थांबून समाजातील प्रत्येक घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील राहून सत्तेत असेपर्यंत पुर्णपणे त्याचा पाठपुरावा करून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा यशस्वी प्रयत्न करू असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

शहरातील एस.एस.व्ही.पी.एस. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात लोकसंघर्ष मोर्चातर्फे खान्देशस्तरीय विचार संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी विचार मंचावर खासदार सुप्रिया सुळे, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, डॉ.विजया अहिरराव, नंदा मावळे, सुवर्णा भदाणे, उषा पाटील, चैताली अमृतकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात शेतीपूरक, पारंपारिक विविध बियाणांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते. आजच्या घडीला शेती हा प्रचंड खर्चिक व भांडवली व्यवसायाचे रुप धारण करणारा विषय झाला आहे. शेती साठी आधुनिक उपकरणे,अनुकूल वातावरणाबरोबरच अन्नधन्य पिकण्यासाठी बीज बियाणांचे संवर्धन होणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे त्यासाठी शेतीची पध्दत अधिक समृद्ध व्हावी म्हणून पारंपरिकरित्या जतन केलेली बियाणे प्रदर्शनात मांडण्यात आली होती.

कार्यक्रमाचे उद्घाटन शेतीचे प्रतिक असलेल्या नांगराची पुजा आणि सृजनशीलतेचे प्रतीक असलेल्या रोपाला पाणी घालून करण्यात आले. महाराष्ट्राच्या विकासाचा हा अनुशेष भरून काढण्यासाठी, आणि उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाची स्वतंत्र स्थापना करून विकास साधण्यासाठी, आदिवासी, कष्टकऱ्यांच्या न्याय व हक्कांंसाठी लढणारी लोकसंघर्ष मोर्चा ही संघटना सतत संघर्ष करत आली आहे.

यंग फाऊंडेशनचे संदीप देवरे, वृषभ अहिरे यांनी क्रांतीगिते सादर केली. कार्यक्रमाचे सुंत्रसंचालन जागृती बोरसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय महाजन, सचिन धांडे, नितीन माने, आसिफ पटेल, भैय्या पाटील, प्रकाश बाविस्कर, प्रकाश पाटील, सचिन पाटील, पल्लवी पाटील, शिवानी मराठे, रोहित येवले, चेतन उपाध्याय, विशाल वानखेडे, मनिष पाटील, किर्तीवर्धन पानपाटील, ईश्वर वाघ, गौतम बोराळे यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमात खान्देशस्तरीय बुद्धीजीवी संघटना,सामाजिक संस्था/संघटना पदाधिकारी,कार्यकर्ते, परिषदेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Next Post
सत्यजीत तांबे यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाला सदीच्छा भेट

सत्यजीत तांबे यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाला सदीच्छा भेट

ताज्या बातम्या

सायबर पोलिसांची मोठी कारवाई; साडेबारा लाखांचे ६२ गहाळ मोबाईल हस्तगत, मूळ मालकांना केले वाटप
खान्देश

सायबर पोलिसांची मोठी कारवाई; साडेबारा लाखांचे ६२ गहाळ मोबाईल हस्तगत, मूळ मालकांना केले वाटप

October 18, 2025
सर्वसामान्य जनतेची कामे करणारे आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद – पालकमंत्री गुलाबराव पाटील
खान्देश

सर्वसामान्य जनतेची कामे करणारे आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

October 18, 2025
सुरक्षित दिवाळीसाठी जळगाव पोलीस दलाचे जाहीर आवाहन; ‘सुरक्षितता’ व ‘सावधानता’ जपा!
खान्देश

सुरक्षित दिवाळीसाठी जळगाव पोलीस दलाचे जाहीर आवाहन; ‘सुरक्षितता’ व ‘सावधानता’ जपा!

October 17, 2025
बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल
खान्देश

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

October 16, 2025
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त
खान्देश

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

October 16, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group