जळगाव, दि.२० – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्षा आतील आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जळगांव जिल्ह्याचा संघ निवडीसाठी निवड चाचणीचे आयोजन रविवार दिनांक २४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ८.०० वाजता अनुभुती आंतरराष्ट्रीय स्कूल मैदानावर करण्यात आले आहे.

दिनांक १/९/२००६ रोजी वा त्यानंतर जन्म झालेलेच खेळाडू या निवड चाचणी साठी पात्र असतील. अशा पात्र खेळाडूंनी खालील लिंकवर जाऊन आपली नाव नोंदणी करावी.. https://forms.gle/NFGYqqJcXev8j2b16

ऑलाईन नोंदणी केलेल्या खेळाडूंनी क्रिकेट साहित्यासह व फक्त क्रिकेटच्या पांढऱ्या गणवेशात मैदानावर सकाळी ८.०० वाजता हजर राहावे, असे जळगांव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव अरविंद देशपांडे, सहसचिव अविनाश लाठी यांनी कळविले आहे.










